सुप्रीम कोर्ट अवमानप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरावर खटला चालवण्यास परवानगी

सुप्रीम कोर्ट अवमानप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरावर खटला चालवण्यास परवानगी
kunal kamra

 नवी दिल्ली- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना बेल दिल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सुप्रीम कोर्टावर एकामागून ट्विटस केले होते. अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी आता कामरा याच्यावर खटला चालवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. 

याविषयी टिप्पणी करताना त्यांनी सांगितले की,'लोकांना वाटतं की त कोर्टाविषयी काहीही बोलू शकतात. मी ट्विट पाहिलेत.' यानुसार कामरा यांच्यावर अवमानप्रकरणी खटला चालू शकतो. वकील रिजवान सिद्दीकी यांनी ही सहमती मागितली होती.
सुप्रीम कोर्टाने काल रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह एका आरोपीला बेलवर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल अर्णब यांना जेलमधून सोडण्यात आले. यानंतर समाज माध्यमांवर अनेक मत प्रवाहाच्या लोकांनी सक्रिय होत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. यावर कुणाल कामरानेही एकामागून एक ट्विट करत सुप्रीम कोर्टावरच आरोप केले. याबाबत वकील रिजवान सिद्दीकी यांनी अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांना लेखी निवेदन देऊन कामरा याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्यात यावा, अशी मागणी केली होती. यावर वेणुगोपाल यांनी आज सहमती दर्शवली आहे.

अर्णब गोस्वामीला जामीन मिळाल्यावर कुणाल कामरा याने ट्विट केले होते. यात म्हटले होते की,' ज्या गतीने सुप्रीम कोर्ट राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यांवर निर्णय देते ते बघता आता न्यायालयामधील महात्मा गांधींचा फोटो काढून त्याठिकाणी हरिश साळवे यांचा फोटो लावण्याची वेळ आली आहे.'  

 एका अन्य ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की,' न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड एक फ्लाईट अटेंडंट आहेत. जे प्रथम श्रेणीच्या यात्रेकरूंना शॅम्पयन ऑफर करत आहेत कारण ते फास्ट ट्रॅक आहेत. परंतु, सामान्यांना तर ही देखील कल्पना नाही की ते कधी या विमानात बसू शकतील. शॅम्पियन मिळण्याची तर गोष्टच निराळी आहे.' 

कॉमेडियन कुणाल कामरा याच्या या ट्विटसवरून न्यायालयाचा अवमान झाला असे मानण्यात येत आहे.  
 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com