IRCTC वरुन रेल्वेसोबतच बस बुकींग सेवेला सुरुवात

जानेवारी 2021 लाच सुरु करण्यात आली होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बस (Bus) बुकींगवर पुढे काम करता आले नव्हते. मात्र, आयआरसीटीसीने (IRCTC) बस बुकींग फीचरसाठी एक नवीन लोगो देखील जारी केला आहे.
IRCTC वरुन रेल्वेसोबतच बस बुकींग सेवेला सुरुवात
IRCTC च्या साईटवर आता रेल्वेबरोबरच बसचे (Bus) देखील बुकिंग करता येणार आहे. Dainik Gomantak

आयआरसीटीसी म्हणजेच भारतीय रेल्वेने आपल्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. कारण IRCTC च्या साईटवर आता रेल्वेबरोबरच बसचे (Bus) देखील बुकिंग करता येणार आहे. ग्राहकाला या पोर्टलवरुन आता www.bus.irctc.co.in वरुन किंवा IRCTCच्या अँपव्दारे बुकिंग करता येणार आहे.

IRCTC च्या साईटवर आता रेल्वेबरोबरच बसचे (Bus) देखील बुकिंग करता येणार आहे.
गोवा सफारीसाठी IRCTC चे शानदार पॅकेज

ही सेवा जानेवारी 2021 लाच सुरु करण्यात आली होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यावर पुढे काम करता आले नव्हते. मात्र, आयआरसीटीसीने बस बुकींग फीचरसाठी एक नवीन लोगो देखील जारी केला असून, त्याव्दारे आता बस बुकिंगला चालना मिळण्याची शक्याता आहे. सध्या या व्दारे 50 हजारांहून जास्त बस बुकिंग करता येत असून, यामध्ये शासकीय आणि खासगी दोनही बसचे बुकींग होऊ शकेत. या बुकींग सेवेत 22 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

IRCTC च्या साईटवर आता रेल्वेबरोबरच बसचे (Bus) देखील बुकिंग करता येणार आहे.
IRCTC द्वारे घेता येणार समुद्रपर्यटनाचा आनंद, ऑनलाईन होणार बुकिंग

कसे कराल बसचे तिकीट बुकींग...

  • याव्दारे तिकीट बुक करताना www.bus.irctc.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.

  • कोठून कोठे प्रवास करावयाचा आहे, ते ठिकाण निवडा.

  • प्रवासाची तारीख निवडा आणि सर्च करा.

  • यानंतर आपल्याला त्या मार्गावरील बसचे अनेक पर्याय उपलब्ध होतील, तसेच तेथे जाण्यासाठी लागणारा कालावधी याची माहिती मिळेल.

  • त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिकीटाची किंमत बसण्याच्या जागेबाबत माहिती दिली जाईल.

  • यात बसचे प्रकार जसे की सीटर, स्लीपर, एसी, नॉन-एसी यासह बोर्डिंग/ ड्रॉपिंग पॉईंट सिलेक्ट करता येईल.

  • सीट आणि जेथून बसणार आहात ते निवडल्यानंतर प्रोसीड टू बुकवर क्लिक करुन, IRCTC चे लॉगिन करावे लागेल.

  • मग तिकीटाची रक्कम आदा करुन सर्व प्रकिया पूर्ण झाल्यानंतर तिकीट बुक होईल.

  • या सेवेचे आणखीन एक विशेष म्हणजे, प्रवाशांना बँक किंवा ई-वॉलेटव्दारे केलेल्या बुकींगमध्ये सवलत मिळेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com