'लोकांचे प्राण आणि रोजीरोटी वाचविणे हेच सर्वांत मोठे काम'

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

कोरोनाच्या लशीवरून एकीकडे केंद्र सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष पेटला असताना सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्याही आमनेसामने आल्या होत्या.

नवी दिल्ली: कोरोनाच्या लशीवरून एकीकडे केंद्र सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष पेटला असताना सीरम आणि भारत बायोटेक या कंपन्याही आमनेसामने आल्या होत्या. अखेर या वादामध्ये आज दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. देशाला एकत्रितपणे कोरोनाच्या लशीचा पुरवठा करण्याची तयारी या कंपन्यांनी दर्शविली आहे.

आजच्या परिस्थितीमध्ये भारताप्रमाणेच जगभरातील लोकांचे प्राण आणि रोजीरोटी वाचविणे हेच सर्वांत मोठे काम आहे. कोरोनावरील लशी या  वैश्‍विक जनआरोग्य वस्तू असून त्यांच्यामध्ये लोकांचे प्राण वाचविण्याची मोठी क्षमता असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला आणि भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. या दोन्ही कंपन्या लसीकरणाच्या आघाडीवर वेगाने काम करत असून देशासह जगभरातील लोकांना कोरोनाची लस सुलभरीत्या उपलब्ध करून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

आणखी वाचा:

‘ब्रिटिश’ कोरोनाचे देशात २० नवे रुग्ण -

संबंधित बातम्या