‘जेएनयू’च्या कुलगुरुंबद्दल पंतप्रधानांकडे तक्रार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केंद्राने कुमार यांची नियुक्ती का केली अशी विचारणा केली.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरुपदी एम. जगदीश कुमार यांच्या नियुक्तीबद्दल सवाल करीत त्यांनी विद्यापीठाचे नाव धुळीस मिळविण्यात कोणतीही कसर सोडली नसल्याची टीका विद्यार्थी संघटनेने केली आहे. संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केंद्राने कुमार यांची नियुक्ती का केली अशी विचारणा केली.

आमच्‍या संघटनेला विद्यार्थ्यांनी निवडून दिले असून दिल्ली उच्च न्यायालयानेही आमची निवडणूक ग्राह्य मानली आहे. पण तुम्ही नियुक्त केलेल्या कुलगुरूंना मात्र लोकशाहीची प्रक्रिया मान्य नसून ते विद्यार्थी संघटनेचे अस्तित्व मान्य करीत नाहीत, असे पत्रात नमूद केले.

संबंधित बातम्या