दिल्लीत रुग्णांबद्दल न्यायालयाकडून चिंता

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सरकार सध्याच्या वास्तवापासून अनभिज्ञ आहे आणि हवेतील प्रदूषणासाठी खबरदारी घेत आहे, मत न्यायालयाने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सरकार सध्याच्या वास्तवापासून अनभिज्ञ आहे आणि हवेतील प्रदूषणासाठी खबरदारी घेत आहे, मत न्यायालयाने म्हटले आहे. 
न्यायाधीश हिमा कोहली आणि न्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या पीठाने राजधानीत कोरोना दराच्या वाढत्या संख्येवरून केजरीवाल सरकारला फटकारले आहे. 

संसर्गाचे सावट असतानाही नागरिकांना संचारासाठीचे निकष सुलभ केल्यानेही ताशेरे ओढले. सरकारने राज्यातील ३३ खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय लागू करण्यासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे सांगितले.

संबंधित बातम्या