शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला; कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

 पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

जलालाबाद :  पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अकाली दलाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर अकाली व कॉंग्रेसचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. यावेळी, वीट व दगडफेक झाली, तसेच गोळीबार झाल्याचीदेखील माहिती मिळाली आहे.त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 कार्यकर्ते गोळी लागल्याने जखमी झाले आहेत.

"रावणाच्या लंकेत पेट्रेल स्वस्त,मात्र रामराज्यात महाग का ?"

जलालाबादमध्ये नगर परिषद निवणुक होत आहे. काल कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) च्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. आज अकाली दलाच्या उमेदवाराचे नामांकन दाखल करण्यासाठी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल स्वत: दाखल झाले. सुखबीर सिंग बादल यांचा कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये पोहोचताच गोंधळ सुरू झाला.चेंगराचेंगरी झाली, लोकांनी बॅरिकेडिंग तोडली आणि कार्यकर्त्यांनी कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करण्यास सुरवात केली. यावेळी दगडफेकही झाली. गोळीबाराच्या अनेक फेऱ्यादेखील झडल्या. एवढेच नाही तर घटनास्थळी सुखबीर सिंग बादल यांच्या कारवर दगडफेकही केली गेली. तथापि, दगडफेक झाली तेव्हासुखबीर सिंग बादल यांच्या गाडीवर दगडफेक सुखबीर सिंग बादल गाडीत नव्हते. पोलिसांच्या मदतीने त्यांना सुखरूप स्थळी नेण्यात आले.

6 फेब्रुवारीला संयुक्त शेतकरी मोर्चाकडून देशव्यापी चक्का जाम

कॉंग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत दोन अकाली कामगार जखमी झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यासाठी हे कॉंग्रेसकडून करण्यात आल्याचा आरोप अकाली दलाने केला आहे. अकाली दलातील नेत्यांनी सांगितले की, कॉंग्रेसचे गुंड गोंधळ घालून आम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखत आहेत.

संबंधित बातम्या