OBC Reservation: रात्री 12 वाजले तरी विधेयक मंजूर करू: कॉंग्रेस

सरकारने हे विधेयक आधी आणायला हवे होते, मात्र ‘देर आये लेकीन दुरुस्त आये’ असे म्हणत कॉंग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी सरकारवर टीका केली.
The Congress has asked the Center to pass the bill even after 12 noon
The Congress has asked the Center to pass the bill even after 12 noonDainik Gomantak

ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) राज्यांना अधिकार देणारे घटना दुरुस्ती विधेयक (Amendment Bill) लोकसभेत मंजूर झाले आहे. आज ते राज्यसभेत सादर करण्यात आले असुन इथे या विधेयकावर चर्चा सुरु आहे. चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले की, सरकार या विधेयकावर चर्चेसाठी दिलेला वेळ तीन तासांनी वाढवण्यास तयार आहे. दुसरीकडे, सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, हे विधेयक मंजूर करण्यासाठी आम्हाला रात्री 12:00 वाजेपर्यंत बसावे लागले तरी आम्ही बसू आणि विधेयक मंजूर करून घेऊ. (Congress has asked the Center to pass the bill even after 12 noon)

काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी सरकारवर टीका करताना ‘देर आये लेकीन दुरुस्त आये’ असे म्हणत टीका केली आहे. सरकारने हे विधेयक आधी आणायला हवे होते.’ तसेच या घटना दुरुस्ती विधेयकात तुम्ही 50 टक्के आरक्षण कोट्याच्या मर्यादेविषयी एक शब्दही बोलला नाही, तर तो वाढवण्याची गरज आहे. 75 ते 80 टक्के राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत जिथे 50% च्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. या विधेयकाद्वारे राज्यांना कागदी दस्तैवज देऊन केंद्र सरकार आपली पाठ थोपटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला.

The Congress has asked the Center to pass the bill even after 12 noon
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेतच अश्रू अनावर

सिंघवी पुढे म्हणाले की, "आज ओबीसी (OBC) समुदायाला सरकारी नोकरीत 22% पेक्षा कमी आरक्षण आहे. तुम्ही म्हणता 27% आरक्षण देत आहोत पण ते 22% आहे आणि त्यातही ते मुख्यतः गट सी श्रेणीमध्ये उपलब्ध आहे." यावेळी त्यांनी सरकारला असाही प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही जातीच्या जनगणनेपासून का पळता आहात ? तुम्ही त्यापासून का दूर जात आहात?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com