Congress On Adani Row
Congress On Adani RowDainik Gomantak

Congress On Adani Row: अदानींविरोधात काँग्रेस मैदानात; LIC, SBI कार्यालयांसमोर उद्या आंदोलन

काँग्रेस पंतप्रधानांना दररोज विचारणार 3 प्रश्न

Congress On Adani Row: उद्योगपती गौतम अदानी सध्या चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग रीसर्चचा अहवाल समोर आल्यापासून गौतम अदानी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. संसदेनंतर आता हा मुद्दा घेऊन काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.

Congress On Adani Row
Ban On Chinese Apps: चीनी अ‍ॅप्सवर भारताचा डिजिटल स्ट्राईक; तब्बल 'इतक्या' अ‍ॅप्सवर घातली बंदी...

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अदानी समूहाविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. मोदी सरकारवर आरोप करत ते म्हणाले, "मोदी सरकार आपल्या जवळच्या मित्रांना मदत करण्यासाठी सामान्य जनतेचा पैसा वापरत आहे. याला काँग्रेसचा विरोध आहे. सोमवारी एलआयसी आणि एसबीआय कार्यालयांसमोर देशभरातील जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येईल."

काँग्रेसती 'हम अदानी के हैं कौन' प्रश्नमालिका...

दरम्यान, याप्रकरणी काँग्रेसने दररोज तीन प्रश्नांची मालिका सुरू केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "अदानी महामेगा घोटाळ्यावर पंतप्रधानांच्या मौनामुळे आम्हाला 'हम अदानी के हैं कौन' ही मालिका सुरू करण्यास भाग पाडले आहे. आम्ही आजपासून पंतप्रधानांना रोज ३ प्रश्न विचारू."

Congress On Adani Row
Chinese Spy Balloon: 'स्पाय बलून' पाडल्याने चीन संतापला; अमेरिकेला दिली धमकी...

रमेश यांचे तीन प्रश्न

रमेश यांनी पहिला प्रश्न गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित विचारला. दुसऱ्या प्रश्नात त्यांनी विचारले की, गौतम अदानी यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सने काय कारवाई केली? तिसऱ्या प्रश्नात विचारले आहे की, देशातील एक उद्योगसमुह विमानतळे, बंदरे चालविण्यात मोनोपॉली कशी निर्माण करू शकतो?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, अदानी समूहाच्या प्रकरणामुळे देशाच्या स्थूल आर्थिक मूलभूत गोष्टींवर किंवा प्रतिष्ठेवर कोणताही परिणाम झालेला नाही. तपास यंत्रणा यावर काम करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com