Congress पक्षाला वादाची परंपरा, 'अधीर रंजन चौधरी पहिलेच नेते नाहीत...', वाचा सविस्तर

Congress Controversial Statements: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे.
Mani Shankar Iyer
Mani Shankar IyerDainik Gomantak

Congress Leader Controversial Statements: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडली आहे. चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली. वास्तविक अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींसाठी 'राष्ट्रपत्नी' हा शब्द वापरला होता. यानंतर भाजपने या प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून भाजपला आयताच मुद्दा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या अशाच काही वक्तव्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दरम्यान, काँग्रेस (Congress) नेत्यांच्या अशा वक्तव्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले वक्तव्य ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) 'चायवाला' म्हटले होते. पंतप्रधान होण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेची खिल्लीही त्यांनी उडवली होती. मोदी काँग्रेसच्या सभांमध्ये चहा वाटू शकतात, परंतु पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्र्यांना चहाची टपरी सुरु करण्यासाठी जागा निश्चित करुन द्यावी, असेही अय्यर म्हणाले होते.

Mani Shankar Iyer
Congress नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची मागितली माफी, 'चुकून ते शब्द निघाले'

मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त वक्तव्य

पंतप्रधान मोदींविरोधात अय्यर यांच्या प्रसिद्ध 'चायवाला' टिप्पणीमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा विजय मिळवण्यात मदत झाली असे मानले जाते. मणिशंकर अय्यर यांनी 2017 च्या गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांना मोदींना 'नीच इन्सान' ही म्हटले होते. यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना निलंबित केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीतही भाजपने बाजी मारली. काही महिन्यांनंतर अय्यर यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

अधीर रंजन चौधरी यांनी यापूर्वीही केले आहे

अधीर रंजन चौधरी यापूर्वीही आपल्या वक्तव्यामुळे अडचणी सापडले होते. कलम 370 हटवण्यावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सरकारने इतर देशांकडून आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर देताना ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे सांगितले होते. यावर अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, 'संयुक्त राष्ट्र 1948 पासून त्यावर देखरेख करत असताना ही अंतर्गत बाब कशी असू शकते.'

Mani Shankar Iyer
पश्चिम बंगालमध्ये कलम 355 लागू करावे; अधीर रंजन चौधरी यांची मागणी

मनीष तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले

यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात असे काही खुलासे केले होते, ज्यांनी काँग्रेसला गोत्यात आणले होते. मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, '26/11 नंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करायला हवी होती. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची सत्ता होती.' शेकडो निरपराधांची निर्घृण हत्या होत असताना संयम हे ताकदीचे लक्षण नाही, असे त्यांनी लिहिले आहे. हे दुर्बलतेचे प्रतीक मानले जाते. 26/11 हा असा काळ होता जेव्हा कारवाई व्हायला हवी होती.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com