काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पोलीसांच्या ताब्यात,उत्तर प्रदेशात राजकारण तापलं

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) शेतकऱ्यांना भेटण्यासाठी रविवारी मध्यरात्रीनंतर लखीमपूर खेरीला (Lakhimpur Kheri) रवाना झाल्या होत्या
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पोलीसांच्या ताब्यात,उत्तर प्रदेशात राजकारण तापलं
Congress Leader Priyanka Gandhi detained in Hargaon before visit Lakhimpur KheriDainik Gomantak

काँग्रेसच्या नेत्या (Congress Leader) प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) शेतकऱ्यांना भेटण्यासाठी रविवारी मध्यरात्रीनंतर लखीमपूर खेरीला (Lakhimpur Kheri) रवाना झाल्या होत्या मात्र लखीमपूर खेरीला पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव (Hargaon) येथून ताब्यात घेतले आहे आणि आता उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) त्यांना नजरकैदेत ठेवले आहे .

मात्र, सुमारे पाच तास पोलिसांना चकवल्यानंतर सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. प्रियंकांना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले आहे. यूपी काँग्रेसने ट्विट करून लोकांना समर्थनासाठी या भागात पोहोचण्यास सांगितले आहे. प्रियंका गांधींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना सीतापूर जिल्ह्यातील सिंधौली येथे नेले आहे.(Congress Leader Priyanka Gandhi detained in Hargaon before visit Lakhimpur Kheri)

दरम्यान, किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देखील शेकडो समर्थकांसह लखीमपूर भागात पोहोचून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, गावातील लोकांना याबाबत माहिती दिली जाईल, जे वाट पाहत आहेत त्यांना याबाबत सारे काही सांगावे लागेल. राकेश सिंह टिकैत म्हणाले की, पुढे काय करायचे याबद्दल समितीच्या लोकांशी चर्चा करून ठरवले जाईल.

Congress Leader Priyanka Gandhi detained in Hargaon before visit Lakhimpur Kheri
केंद्र सरकारला 'सहकाराचं साकडं' घालणार, सकाळ महा कॉन्क्लेव्हमध्ये शरद पवारांचं आश्वासन

हिंसाचाराच्या घटनेवरून प्रियांकाने भाजपवर निशाणा साधला असून या देशात शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार आहे का हे जाणून घ्यायचे आहे असे म्हणत 'भाजप देशातील शेतकऱ्यांचा किती तिरस्कार करतो? शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही का? जर त्यांनी आवाज उठवला तर तुम्ही त्यांना गोळ्या घालणार का, तुम्ही त्यांना गाडीखाली चिरडणार ? हा शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपच्या क्रूर विचारसरणीचा नाही. किसान सत्याग्रह बळकट होईल आणि शेतकऱ्याचा आवाज मोठा होईल." असा घणाघात प्रियांका गांधी यांनी भाजप सरकारवर केला आहे.

त्याचबरोबर सीतापूर ते लखीमपूर खेरी दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून कोणत्याही नेत्याला लखीमपूर खेरीमध्ये येऊ नये. याआधी लखीमपूर खेरीला जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियंका गांधींना लखनौमधील कौल हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. प्रियंका गांधी आणि दीपेंद्र सिंह हुडा रविवारी रात्री लखनौला पोहोचले होते.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या रविवारी लखीमपूर खेरी दौऱ्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जात होत्या स्थानिक प्रशासनाच्या मते उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com