"पंतप्रधान मोदींची उद्योगपतींशी भागीदारी"

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

उद्योगपतींनी मोदींना माध्यमे दिली त्याबदल्यात मोदींनी त्यांना रग्गड पैसा दिला, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज येथे जाहीरसभेत बोलताना केला.

कोइमतूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बड्या उद्योगपतींशी भागीदारी असून जे काही जनतेच्या मालकीचे आहे त्याची विक्री करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. मोदींनी सत्तेत आल्यानंतर काय केले? देशातील तीन चार बडे उद्योगपती हाताशी धरले, या उद्योगपतींनी मोदींना माध्यमे दिली त्याबदल्यात मोदींनी त्यांना रग्गड पैसा दिला, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज येथे जाहीरसभेत बोलताना केला.

नष्ट व्हायच्या मार्गावर असलेल्या हिमबिबट्यांच्या संख्येत वाढ 

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने तमिळनाडूमध्ये काल प्रचाराचे रणशिंग फुंकले. तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल  यांनी पहिल्यांदाच झंझावाती प्रचारसभा घेत केंद्राला धारेवर धरले.

काश्‍मिरी पंडिताला दिला मुस्लिमांनी खांदा

देशाच्या आणि तमिळनाडूच्या मालकीची प्रत्येक गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी विकत आहेत. जे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहे, ते नव्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून हिरावून घेतले जात आहे. आताही कामगार व शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतींचा नोकर बनविण्याचे कारस्थान आखले जात आहे, अशी टीका राहुल यांनी केली. 

तमीळ अस्मितेला स्पर्श

राहुल म्हणाले की,‘‘पंतप्रधान मोदींना तमिळनाडूमधील संस्कृतीबाबत कसलाही आदर नाही. या राज्यातील जनता, भाषा आणि संस्कृती हे आपल्याच सांस्कृतिक संकल्पनेचे नोकर असावेत असे त्यांना वाटते.’’  

संबंधित बातम्या