...वो डरे हैं, देश नहीं! राहुल गांधींनी धरले मोदी सरकारला धारेवर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

दिल्लीतील राजकारण तापले आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षानी भाजपाला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनीही काही घटनांचा दाखला देत सरकारवर टिका केली आहे.

नवी दिल्ली:  दिल्ली शेतकरी आंदोलनासोबतच अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी धारेवर धरले आहे. दिल्लीतील राजकारण तापले आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षानी भाजपाला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनीही काही घटनांचा दाखला देत सरकारवर टिका केली आहे.

केजरीवाल यांनी हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असल्याचे वर्णन केले तर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी एक हिंदी कविता अपल्या ट्विटरवरून शेअर केली आहे. सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या चळवळीशी संबंधित टूलकिट शेअर  केल्याबद्दल पर्यावरणीय कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक केली आहे. या घटनेचे औचित्य साधत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सोमवारी सरकारवर निशाणा साधला. "ते घाबरले आहेत, देश नाही" असे म्हटले आहे.दिशाच्या अटकेसंदर्भातील बातम्या शेअर करत राहूर गांधींनी ट्विट केले आहे. कॉग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही सरकारवर निशाणा साधत “डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से” असे उल्लेखनीय ट्विट त्यांनी केले आहे.

दिल्ली शेतकरी आंदोलनासंदर्भात टूलकिट तयार करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर काल रविवारी (14फेब्रुवारी) पोलिसांनी दिशा रवी या तरुणीला टूलकिट  प्रकरणात अटक केली आहे. देशातील राजकीय वातावरण तिच्या अटकेवरून तापले आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून मोदी सरकारवर विरोधकांनी प्रचंड टीका केली आहे.

भगवद्गीता आणि पंतप्रधान मोदींचा फोटो घेऊन नवा उपग्रह अंतराळात झेपावणार -

दिल्ली पोलिस सायबर सेलच्या पथकाने दिशा रवी (वय 22) हिला अटक केली असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. रवी आणि इतरांनी खलिस्तान समर्थक 'पोएटीक जस्टिस फाउंडेशन' या संघटनेची भारताविरूद्ध मतभेद पसरवण्यासाठी एकत्र काम केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. दिशा रवीने बेंगळुरूमधील एका खासगी महाविद्यालयातून बीबीए पदवी मिळविली असून ती ‘फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया’ नावाच्या संस्थेची संस्थापक सदस्याही आहे. 

 

संबंधित बातम्या