"ना जवान ना किसान मोदी के लिए सिर्फ उद्योगपति ही भगवान"

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दिल्ली:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प कष्ट करणारी शेतकऱ्यांच्या आणि सीमेवर रक्षा करणाऱ्या जवानांच्या फायद्याचा नसून केवळ उद्दोगपतींच्या फायद्याचा आहे, अशी टीका राहुल गांधीनी केली आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांचा हिताचा नसून केवळ उद्दोगपतीचा अर्थसंकल्प असल्याची टिकाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. 

राहूल गांधी यांनी सरकारच्या सैनिक पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. काही उद्दोगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून सैंनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. अर्थसंकल्पामध्ये सैंनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे. जवान आणि शेतकरी नाहीत तर मोदी सरकारसाठी केवळ तीन-चार उद्दोगपती देव आहेत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी : शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावं, चर्चेतून मार्ग काढू -

दरम्यान राहुल गांधीनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन सरकारवर निशाणा साधला होता. भाजप सरकारने देश आणि घर या दोन्हींचे बजेट बिघडवले आहे. यादरम्यान, दिडपट  हमी भाव देण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या अर्थसंकल्पात जास्त पीक कर्जाची तरतुद केली आहे.

संबंधित बातम्या