राहुल गांधीनी मच्छिमारांसमवेत चक्क समुद्रात उडी घेतली! उपस्थितांना आश्चर्याचा धक्का

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला, जेव्हा राहुल गांधी मासे पकडण्यासाठी मच्छीमारांबरोबर चक्क समुद्रात उडी घेतली. त्यांच्या या कृतीची त्यांच्या सहकारी नेत्यांनादेखील माहिती नव्हती.

कोल्लम : कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी काल केरळ दौऱ्यादरम्यान कोल्लम जिल्ह्यातील मच्छिमारांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी या मच्छिमारांबरोबर मासे पकडण्याचा आनंदही लुटला, मासे पकडणयाचं त्यांचं कसब, पद्धती याबद्दल माहिती घेतली. पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला, जेव्हा राहुल गांधीनी मासे पकडण्यासाठी मच्छिमारांबरोबर चक्क समुद्रात उडी घेतली. त्यांच्या या कृतीची त्यांच्या सहकारी नेत्यांनादेखील माहिती नव्हती. राहुल गांधीची ही कृती बघून तेदेखील अवाक् झाले. मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी सापळा रचला, हे पाहिल्यावर राहुल गांधीनी समुद्रात उडी घेतली, त्यांच्या या कृतीमुळे आश्चर्यचकित झालेल्या त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांनीदेखील नावेतून उडी घेतली. 

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यामुळे कॉंग्रेस बॅकफूटवर

कोल्लम जिल्ह्यातील मच्छीमारांना भेटण्यासाठी कॉंग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी बुधवारी केरळमध्ये दाखल झाले. या वेळी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उडी घेतली. त्यांच्याबरोबर राहुल गांधीही समुद्रात उतरले. राहुल गांधी तब्बल 10 मिनिटे समुद्रात होते. समुद्रात त्यांनी मासेमारांशी मासे पकडण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा केली, आणि पुन्हा नावेत चढले. यावेळी मच्छिमारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे मला जाणून घ्यायाचे होते, असे राहुल गांधीनी सांगितले. 

अशोक दिंडा आता राजकारणात 'नशीब' आजमावणार; भाजपमध्ये केला पक्षप्रवेश

राहुल यावेळी म्हणाले, "आज सकाळी मी मच्छिमार बांधवांबरोबर समुद्रात गेलो, बोटीच्या प्रवासाची सुरूवात झाल्यापासून शेवट होईपर्यंत त्यांनी खूप कष्ट घेतले, मच्छीमारांनी जाळे समुद्रात फेकले व काही वेळाने बाहेर काढले, पण एवढे करूनदेखील आमच्या जाळ्यात फक्त एकच मासा पकडला गेला. यावरून आम्हाला कळाले, सगळ्या पद्धतींचा नीट अवलंब करून, एवढे परिश्रम घेऊनही झालेला खर्च भरून निघत नाही. मी विचार करीत होतो की जाळे पुष्कळशा माशांनी भरले जाईल, परंतु ते रिकामेच राहीले. मी माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी हे बघितलं."

संबंधित बातम्या