''विज्ञान खोटं बोलत नाही, पंतप्रधान मोदी बोलतायेत'': राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul GandhiDainik Gomantak

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या मुद्यावरुन हा निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'कोरोना महामारीमुळे 47 लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. सरकारने दावा केल्याप्रमाणे 4.8 लाख नाही. विज्ञान खोटं बोलत नाही, मोदी बोलतात. ज्या कुटुंबांनी प्रियजन गमावले आहेत, त्यांचा सन्मान करा. त्यांना अनिवार्यपणे ₹ 4 लाखाची भरपाई द्या.' यासोबतच राहुल गांधींनी WHO चा अहवालही जोडला. (Congress leader Rahul Gandhi once again criticized Prime Minister Narendra Modi)

याआधी राहुल गांधी यांनी पेन्शनच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला (Modi Government) घेरले होते. त्यांनी माजी सैनिकांना एप्रिल महिन्याची पेन्शन न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. हिंदुस्तान टाईम्स या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत माजी काँग्रेस (Congress) अध्यक्षांनी नरेंद्र मोदी सरकार सैनिकांचा आणि देशाचा अपमान करत असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

Congress leader Rahul Gandhi
Video: राहुल गांधी फिरायला पुन्हा परदेशात; काठमांडूमध्ये रंगली बार पार्टी?

तसेच, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत म्हटलयं की, "वन रँक, वन पेन्शनच्या फसवणुकीनंतर आता मोदी सरकार 'ऑल रँक, नो पेन्शन'चे धोरण अवलंबत आहे... सैनिकांचा अपमान हा देशाचा अपमान आहे... पेन्शन पाहिजे. लवकरात लवकर देण्यात यावी.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com