'हिटलर की मौत मरेगा मोदी', काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील 'सत्याग्रहा'च्या मंचावरुन पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
Pm Modi
Pm ModiDainik Gomantak

अग्निपथ योजना आणि राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीवरुन संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील 'सत्याग्रहा'च्या मंचावरुन पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. झारखंडमधून आलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने त्यांची हिटलरशी तुलना करुन मर्यादा ओलांडली. (congress leader Subodh Kant Sahay controversial comment on pm Modi)

सहाय म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी हिटलरच्या मार्गावर चालले असून हिटलरसारखाच त्यांचा मृत्यू होईल.' सुबोध कांत यांनी ही टीका केली तेव्हा काँग्रेसचे (Congress) अनेक बडे नेते मंचावर उपस्थित होते आणि वादग्रस्त वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाटही झाला.

Pm Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर

दरम्यान, गेले 10 दिवस आपण संघर्ष करत आहोत. कोणाच्याही चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीत. कारण मोदींना 135 वर्षांचा इतिहास माहीत नाही. परंतु आपण कोणती परंपरा पाळतो हे काँग्रेसच्या लोकांना माहीत आहे, असेही सहाय म्हणाले.

पीएम मोदींना मदारी म्हटले

सुबोधकांत सहाय म्हणाले, "झारखंडमध्ये (Jharkhand) आमचे युतीचे सरकार आहे, ते पाडण्यासाठी ईडीचे दीड महिन्यांपासून दररोज छापे पडत आहेत. भाजपने आपली 2-3 निवडून आलेली सरकारे कशी पाडली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मदारीच्या रुपाने या देशात आलेले मोदी पूर्णत: हुकूमशाहीत आले आहेत.''

Pm Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-21 जून रोजी 2 दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर

काँग्रेस हा हुतात्म्यांचा पक्ष असल्याचे सांगून माजी मंत्री पुढे म्हणाले, ''काँग्रेसने कधीच लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. नेहरु गांधी कुटुंबात, जेव्हा सोनिया गांधी (Sonia Gandhi) पंतप्रधान होण्यास नकार देत होत्या, तेव्हा मी त्यांचा माईक हिसकावून घेतत म्हणालो होतो की, तुम्हाला बोलू देणार नाही, कारण तुमच्या नावावर आम्ही सर्वानुमते शिक्कामोर्तब केला आहे. काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता हे सहन करणार नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com