"कंगना रनौत नाच गाणे वाली" कॉग्रेस नेत्याने केले जाहीर वक्तव्य

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते सुखदेव पानसे यांनी अभिनेत्री कंगना रनौतला "नाच-गाणे- वाली "असे संबोधले आहे. 

भोपाळ: मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते सुखदेव पानसे यांनी अभिनेत्री कंगना रनौतला "नाच-गाणे- वाली "असे संबोधले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांना असे बोलताना ऐकले गेले आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नुकत्याच कंगना रानौतच्याविरोधातनिषेध करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांविरोधात पोलिस कारवाईबाबत निवेदन देण्यासाठी सुखदेव पानसे बेतुल जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. “राज्यात खुलेआम सट्टा आणि जुगार सुरू आहे त्याकडे राज्य पोलिस प्रशासनाचे लक्ष नाही. त्यावर कोणती पोलिस कारवाई केली जात नाही, मात्र जेव्हा दिल्लीतील शेतकऱ्यांवर एका नाच-गाणं करणाऱ्या कंगना रनौतने अपमानास्पद वक्तव्य केले त्या विरोधात आमच्या कॉग्रेस कार्यकर्त्यांनी शांततेत निषेध केला, तर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला,” असे मत त्यांनी कार्यालयाबाहेर संवाद साधतांना व्यक्त केले.

माजी मंत्री सुखदेव पानसे पक्षाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले होते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. “दिल्लीतील आंदोलक शेतकर्‍यावर कंगना रानौतने  केलेल्या वादग्रस्त ट्विटचा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांततेने विरोध केला होता परंतु त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला,” असे या निवेदनात म्हटले आहे.

तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांवर टीका करत अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या ट्वीटर अकाउंटवरून शेतकऱ्यांना “दहशतवादी”, “देशद्रोही” आणि “खलिस्तानी” असे संबोधले होते.

 

संबंधित बातम्या