काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

दैनिक गोमंतक
रविवार, 16 मे 2021

कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते.

कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले असून लाखो लोकांचे मृत्यू होत आहेत. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांचे आज पुण्यात निधन झाले. कोविड-19 (Covid-19) पॉझिटिव्ह आल्यानंतर खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर सर्व पक्षीय नेतेमंडळींकडून शोक व्यक्त केला जात आहे. (Congress MP Rajeev Satav passes away)

Goa: मुख्यमंत्री 'ऍक्शन मोडवर'; राज्यातील 21 रुग्णालयं घेतली...

19 एप्रिल रोजी सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली तर  22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली  व ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.  25 तारखेला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आलं  होतं. परंतु 10 मे रोजी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असं वाटत असतानाच पुन्हा प्रकृती खालावली आणि आज सकाळी 9 ते 9:30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

संबंधित बातम्या