‘केंद्राकडून लष्कराच्या मनोधैर्याचे खच्चीकरण’

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

लष्करी अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा मोदी सरकारच्या निर्णयावर कॉंग्रेसने आगपाखड केली आहे. यामुळे लष्करी अधिकाऱ्यांचे निवृत्तिवेतन निम्म्याहून अधिक कापले जाणार आहे.

नवी दिल्ली : लष्करी अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा मोदी सरकारच्या निर्णयावर कॉंग्रेसने आगपाखड केली आहे. यामुळे लष्करी अधिकाऱ्यांचे निवृत्तिवेतन निम्म्याहून अधिक कापले जाणार आहे. या निर्णयातून सरकार लष्कराचे मनोधैर्य कमकुवत करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. 
लष्करी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाला कात्री लावल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या करिअर पर्यायावरही दरोडा घालण्याच्या तयारीत आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी 
चढवला.  
 

संबंधित बातम्या