‘महागाई हटाओ’ म्हणत काँग्रेसचा मोदी सरकार विरोधात देशभरात एल्गार

पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी या रॅलीला संबोधित करणार आहेत.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 19 नोव्हेंबरला विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.
Congress plan big rally against inflation against Modi government
Congress plan big rally against inflation against Modi government Dainik Gomantak

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे (Assembly Election) काँग्रेस (Congress) देशभरात सक्रिय होताना दिसत आहे. महागाई (Inflation) विरोधात देशभरात काँग्रेस मोठा मोर्चा काढणार आहे. काँग्रेसतर्फे 12 डिसेंबर रोजी दिल्लीत ‘महागाई हटाओ’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) या रॅलीला संबोधित करणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 19 नोव्हेंबरला विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. याआधी गुरुवारी, काँग्रेस नेते 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पक्ष उपस्थित करणार्‍या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या संसदीय धोरण गटाच्या बैठकीत पोहोचले. पक्षाच्या हिवाळी अधिवेशनात दरवाढीसह अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.(Congress plan big rally against inflation against Modi government)

Congress plan big rally against inflation against Modi government
संसदेचे हिवाळी अधिवेशन: भाजपने खासदारांसाठी केला व्हीप जारी!

काल सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हजेरी लावल्यानंतर २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात ही बैठक झाल्याचे सांगितले होते.या बैठकीत अधिवेशनात कोणते विषय मांडणार यावर चर्चा झाली असून शेतकरी, एमएसपी आणि लखीमपूर खेरीची घटना काँग्रेस अधिवेशनात आणणार आहे. विरोधी पक्षांशी एकजूट करून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले जातील.असे काँग्रेस कडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, आम्ही संसदेच्या आगामी अधिवेशनात महागाईचा मुद्दा उपस्थित करू.

हिवाळी अधिवेशनासाठी सरकारच्या अजेंड्यात 26 नवीन विधेयकांचा समावेश आहे, ज्यात क्रिप्टोकरन्सीवरील कायदा आणि दुसरे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com