Congress President Election: खर्गे तयार, दिग्विजयांची माघार; अध्यक्षपदासाठी शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे मैदानात

के. एन त्रिपाठी यांनी देखील भरला उमेदवारी अर्ज
Mallikarjun Kharge & Shashi Tharoor
Mallikarjun Kharge & Shashi TharoorDainik Gomantak

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. काँग्रेसच्या गोटातून आज अनेक घडामोडी समोर आल्या. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी या आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तर, मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Khadge) अध्यक्षपदासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge & Shashi Tharoor) यांच्यात रंगणार असे दिसत आहे.

तसेच, झारखंड येथील काँग्रेस नते के. एन त्रिपाठी यांनी देखील काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले, “खर्गे हे माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि त्यांना सांगितले की त्यांनी जर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. त्यांनी सांगितले होते की ते अर्ज दाखल करणार नाहीत. परंतु नंतर मला असे समजले की ते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.”

Mallikarjun Kharge & Shashi Tharoor
Light Combat Helicopter: लष्कराला मिळाले पहिले लढाऊ हेलिकॉप्टर, जाणून घ्या खासियत

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार आहेत.

गांधी घराण्यासोबत जवळीक असणारे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी खर्गे यांना हायकमांडच्या निर्णयाची माहिती दिली. गांधी कुटुंब या निवडणुकीत निष्पक्ष असेल आणि खर्गे अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. असे वेणुगोपाल म्हणाले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही हाच नियम लागू करत साईड लाईन करण्यात आले. अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतीन माघार घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com