Mallikarjun Kharge : 'बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे', मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले

Congress Presidential Candidate: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसच्या चेहऱ्याबद्दल उत्तर दिले.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeDainik Gomantak

Mallikarjun Kharge Statement: काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेले मल्लिकार्जुन खर्गे सध्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आहेत. समर्थन मागण्यासाठी ते मध्य प्रदेश दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसच्या चेहऱ्याबद्दल उत्तर दिले.

कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) माध्यमाशी बोलताना म्हणाले की, 'आधी अध्यक्षाची निवड होऊ द्या, त्यानंतर पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबद्दल विचार करु. खर्रे पुढे म्हणाले, 'बघा, आधी अध्यक्ष निवडला पाहिजे. आमच्या इथे एक म्हण आहे की, 'बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे', आधी ही निवडणूक संपू दे... मला आधी अध्यक्ष होऊ द्या, मग बघू.'

Mallikarjun Kharge
Owaisi's Reply To Bhagwat: कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लिमांकडून; मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नसून घटतीय!

दरम्यान, काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. प्रत्येक राज्याच्या राजधानीत सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान गुप्त मतदानाद्वारे होईल. त्यानंतर सर्व मतपेट्या AICC मुख्यालयात आणल्या जातील. 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणी संपताच निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे आणि शशी थरुर आमनेसामने आहेत.

खर्गे यांना काय विचारले होते?

पत्रकार परिषदेत खर्गे यांना विचारण्यात आले की, अध्यक्षपदी तुमची निवड निश्चित असली तरी तुम्ही अध्यक्ष झालात तर पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, तुम्ही की राहुल गांधी (Rahul Gandhi)? या प्रश्नाला उत्तर देताना खरगे म्हणाले, "सगळ्यात आधी मी संघटनेच्या निवडणुकीसाठी आलो आहे, इथे एक म्हण आहे, ती मी अनेक ठिकाणी बोलून दाखवतो, 'बकरीद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे'. आधी मला अध्यक्ष होऊ द्या, मग बघू''

Mallikarjun Kharge
Bhagwat On Population Control: देशाला व्यापक लोकसंख्या नियंत्रण धोरणाची गरज

तसेच, आपला मुद्दा पुढे करत खर्गे पुढे म्हणाले की, 'संविधान नष्ट करणारे, स्वायत्त अधिकार कमकुवत करणारे, त्याचा गैरवापर करणारे आणि जिथे जिथे आपली सरकारे आहेत, तिथे मोदी आणि शहा यांनी मिळून आमचे आमदार चोरले. हे भाजप सरकार आपल्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सात राज्यात सरकारे स्थापन झाली. मात्र आमदार चोरीमुळे आमचे कर्नाटकमधील सरकार गेले, मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) सरकार गेले, मणिपूरमधील सरकार गेले आणि गोवा गेले.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com