काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा सुटेना; पुन्हा टळली निवडणूक

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

कोरोना परिस्थितीचे कारण समोर ठेऊन समितीने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉंग्रेस (C0ngress) पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Election) पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या कोरोना (Corona) परिस्थितीचे कारण समोर ठेऊन समितीने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना साथीच्या सद्यस्थितीत निवडणुका घेणे योग्य होणार नाही आणि म्हणूनच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. निवडणुकीची नवीन तारीख केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून नंतर जाहीर केली जाईल. (The Congress presidential election was postponed.)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे अंतरिम अध्यक्ष केले गेले होते.  2 वर्षानंतरही पक्षाध्यक्षपदी कुणाचीही निवड झालेली नाही. जूनमध्ये पुन्हा एकदा राहुल गांधींना कॉंग्रेसची कमांड दिली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. 

''निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झालं की पक्ष सुधारणे आवश्यक'...

कॉंग्रेस पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक अशा वेळी स्थगित केली होती जेव्हा पक्षाचे अनेक नेते आणि संपूर्ण संघटना लवकरच निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करत आहेत. अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या 23 प्रमुख नेत्यांनी ही मागणी केली असल्याचे समजते आहे. संघटनेच्या निवडणुकांमुळे आणि पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे मत या नेत्यांनी व्यक्त केले आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षालाही पराभवाचा धक्का बसला आहे. तामिळनाडूशिवाय इतरत्रही पक्षाला अत्यंत निराशाजनक निकाल मिळाले आहेत. 

संबंधित बातम्या