Congress Protest: "70 वर्षांची लोकशाही 8 वर्षात संपली": राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लोबल

'आम्हाला बोलू दिले जात नाही, संसदेत चर्चा होत नाही, आम्हाला अटक केली जाते, ही आज भारताची स्थिती आहे. आपली 70 वर्षांची लोकशाही 8 वर्षात संपली'
Rahul Gandhi PM Narendra Modi
Rahul Gandhi PM Narendra ModiDainik Gomantak

Congress Protest Delhi: ईडीच्या कारवाईदरम्यान काँग्रेस देशभरात महागाई आणि बेरोजगारीविरोधात रस्त्यावर उतरली आहे. दिल्लीसह देशभरात काँग्रेस नेत्यांचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या दिल्लीतील निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'देशातील लोकशाही संपत असल्याचे पाहून तुम्हाला कसे वाटते. आज देशात लोकशाही नाही. आज देशात चार लोकांची हुकूमशाही आहे. आम्हाला महागाई, बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा आहे. आम्हाला याबद्दल चर्चा करायची आहे. आम्हाला बोलू दिले जात नाही. संसदेत चर्चा होत नाही. आम्हाला अटक केली जाते. ही आज भारताची स्थिती आहे. आपली 70 वर्षांची लोकशाही 8 वर्षात संपली.'

Rahul Gandhi PM Narendra Modi
अंतराळात फडकणार तिरंगा, 750 विद्यार्थिनींनी बनवलेला 'आझादीसॅट' इस्रो करणार लॉन्च

विरोधक का दिसत नाहीत

राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'लोकशाहीत जे विरोधक लढतात ते संस्थांच्या बळावर लढतात. देशाची न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांच्या बळावर विरोधी पक्ष उभा आहे. मात्र आज या सर्व संस्था सरकारला साथ देत आहेत. सरकारने आपल्या लोकांना येथे बसवून ठेवले आहे. भारतातील प्रत्येक संस्था आज पारतंत्र्यात आहे. आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाही, आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. जर कोणी विरोधकांना पाठिंबा द्यायचा असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही.'

सरकार सर्व काही नाकारते - राहुल

अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही असा सवाल गांधी यांनी आज पत्रकार परिषेदत केला. 'स्टार्टअप इंडिया कुठे आहे ते सांगा? या लोकांचे म्हणणे आहे की कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. 5 दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु हे सरकार हा दावा नाकारत आहे.' असे म्हणत गांधींनी मोदी सरकारला फटकारले आहे.

ईडीच्या कारवाईबाबत बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, 'मी जे काही बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरतो. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते. लोकांच्या शक्तीला हे सरकार घाबरते. महागाई आणि बेरोजगारीची भीती वाटते. हे लोक 24 तास खोटे बोलण्याचे काम करतात.'

देशात हुकूमशाहाचे सरकार

'केवळ काँग्रेसच नाही तर देशातील कोणताही अभिनेता किंवा कोणीही व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलला तर त्याच्यामागे संपूर्ण यंत्रणा उभी केली जाते. भारतात लोकशाही संपली आहे. त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील. भारतीय जनता गप्प बसणार नाही. हिटलरनेही निवडणूक जिंकली होती. कारण सर्व संस्थांचे नियंत्रण हिटलर सरकारच्या हातात होते,' असे म्हणत गांधी यांनी मोदी सरकारला हुकूमशाहाचे सरकार असल्याचे सांगितले आहे.

Rahul Gandhi PM Narendra Modi
'आम्ही मोदींना घाबरत नाही' : National Herald ऑफिस सील केल्यानंतर राहुल गांधीचा सरकारवर हल्लाबोल

देशात ईडीच्या दहशतीचे वातावरण

यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, 'देशात संविधानाची पायमल्ली केली जात आहे. देशात ईडीच्या दहशतीचे वातावरण आहे. देशात अतिशय धोकादायक खेळ सुरू आहे. वृत्तपत्रांवर हल्ला होत आहे, मात्र उद्या त्यांच्यावरही हल्ला होऊ शकतो, हे देशातील मीडियाला समजून घ्यावे लागेल. आज माध्यमांनी धैर्य दाखवण्याची गरज आहे. आज जर आपण गप्प बसलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com