Congress AIUDF: भाजपची बी टीम म्हणत काँग्रेसने 'या' पक्षाला दिला मोठा झटका, यूपीएमधून टाकले काढून

Congress: देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु असतानाच कॉंग्रेसमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहेत.
Mallikarjun Kharge And Sonia Gandhi
Mallikarjun Kharge And Sonia GandhiDainik Gomantak

Congress AIUDF: देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु असतानाच कॉंग्रेसमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहेत. यातच आता कॉंग्रेसने यूपीएमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाची (AIUDF) हाकलपट्टी केली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही घोषणा केली. आसाममधील या पक्षाला त्यांनी भाजपची बी टीम म्हटले आहे. एआययूडीएफचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला.

जयराम रमेश काय म्हणाले?

काँग्रेसने (Congress) बुधवारी बदरुद्दीन अजमल यांच्यावर कथित वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आणि आरोप केला की, ते देखील असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) सारखे 'भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून काम करत आहेत. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, अजमल काहीही दावा करु शकतात, पण आता त्यांचा संयुक्त पुरोगामी आघाडीशी (यूपीए) काहीही संबंध नाही.

Mallikarjun Kharge And Sonia Gandhi
Bharat Jodo Yatra: 9 दिवसांच्या विश्रातीनंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आजपासून सुरु

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजमल यांनी यापूर्वी आरोप केला होता की, आसाममधील (Assam) काँग्रेस नेते रात्रीच्या वेळी मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांच्याकडून 'पॅकेट्स' घेतात. तर रमेश यांनी बुधवारी एक निवेदन जारी करुन म्हटले की, 'खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाममधील काँग्रेस नेतृत्वाविरोधात पूर्णपणे अस्वीकार्य आणि मूर्खपणाची विधाने केली आहेत. हे स्पष्टपणे अपमानजनक आहे.'

Mallikarjun Kharge And Sonia Gandhi
Bharat Jodo Yatra: धास्ती कोरोनाची की काँग्रेसची? भारत जोडो यात्रा बंद करण्याचे राहुल गांधींना पत्र

रमेश पुढे म्हणाले की, 'देशात राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' आणि आसाममध्ये स्वतंत्रपणे काढण्यात आलेल्या 'भारत जोडो यात्रे' नंतर मुख्यमंत्री आणि अजमल काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. अजमल हे एआयएमआयएम सारख्या काही पक्षांप्रमाणेच भाजपसाठी भूमिका बजावत आहेत. आता अजमल यांचा यूपीएशी काहीही संबंध नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com