UnionBudget2021: सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे फसवणूक - काँग्रेस

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यानंतर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असेलेल्या काँग्रेसने अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यानंतर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असेलेल्या काँग्रेसने अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत, केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प एका शब्दात मांडायचा झाल्यास हे फसवे बजेट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय या अर्थसंकल्पाचा सारांशचा फसवणूक असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हणत, हा बजेट फसवणुकीवर आधारित असल्याचा मोठा आरोप केला आहे. 

Union Budget 2021: संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी अर्थसंकल्पाचे केले...

त्यानंतर, सरकारने अर्थसंकल्पात मांडलेल्या निर्गुंतवणुकीकरण संदर्भात बोलताना, रणदीप सुरजेवाला यांनी सरकारचे हे धोरण म्हणजे ''बेच खाएंगे सब कुछ और छोड़ेंगे नहीं अब कुछ,'' असे म्हटले आहे. तसेच या अर्थसंकल्पाने गरीब, नोकरदार, शेतकरी-मजदूर, लहान छोटे उद्योजक आणि यांच्यासह अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकणार्‍या खासदारांनाही धोका दिल्याचा गंभीर आरोप रणदीप सुरजेवाला यांनी सरकारवर केला आहे. त्यानंतर देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असलेल्या काही बाबींवर अर्थमंत्र्यांनी कोणतीही घोषणा बजेट मध्ये केली नसल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. खासकरून देशाच्या संरक्षणाच्या बजेट मध्ये कोणतीही वाढ केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला. इतकेच नाही तर, चीनने देशाचा काही भाग गिळंकृत केलेला असताना यावर अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये भाष्य देखील करण्याला प्राथमिकता दाखविली नसल्याचे रणदीप सुरजेवाला पत्रकार परिषदेत म्हणाले.   

याशिवाय, वित्त आयोग आणि लसीकरणाचा खर्च सोडल्यास पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचे बजेटदेखील आरोग्याच्या बजेट मध्ये सामील करून आकडेवारीची मायावी जादू सादर करण्याचा अयशस्वी प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचा मोठा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी यावेळेस केला. यानंतर, वित्तीय तूट जवळजवळ दहा टक्क्यांवर पोहचली असून, गुंतवणूकदारांसाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. आणि अर्थव्यवस्था आणि रोजगार या दोन्ही गोष्टी निर्माण करणार्‍या सरकारी खर्चामध्ये एक पैसाही न वाढवता बजेट सादर करणे हे सरकारच्या चुकीच्या अग्रक्रमांना दर्शवित असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. 

तसेच, यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वात मोठी फसवणूक शेतीबाबत केली असल्याचे टीकास्त्र रणदीप सुरजेवाला यांनी केले. शेतीच्या बजेटमध्ये सुमारे सहा टक्क्यांची कपात, मार्केट इंटरव्हेन्शन योजना 2000 कोटींवरून 1500 कोटींवर, पंतप्रधान किसान योजनेत देखील तेरा टक्क्यांनी कपात केली असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. यासह लघू आणि मध्यम उद्योगांसाठी 15700 कोटींची घोषणा करुन या क्षेत्राला मोठा झटका दिला असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. याशिवाय सरकारी बँकांवर टाळे लावण्यासाठी आणखी एक पाऊल सरकारकडून उचलले असल्याचे सांगून, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी या बजेटने मोठा धोका झाल्याचा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.      

 

दरम्यान, वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील दुसऱ्या वर्षाकरिता 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना यंदाचे बजेट हे मुख्यत्वेकरून सहा गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आखण्यात आल्याचे  निर्मला सीतारमण यांनी सांगितले. आरोग्य आणि कल्याण, भौतिक-आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, महत्वाकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मानवी भांडवलाची पुनरुज्जीवन, नूतनीकरण अनुसंधान व विकास, किमान सरकार आणि अधिक गव्हर्नन्स या मुख्य मुद्द्यांवर असल्याचे निर्मला सीतारमण यांनी नमूद केले.  

संबंधित बातम्या