मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल यांच्या नावावर अटकळबाजी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

काँग्रेसचे अध्यक्षपद न स्वीकारण्यावर गांधी कुटुंबीय ठाम राहिल्यास आणि अन्य कुणा ‘बिगर-गांधी’ व्यक्तीकडे पक्षाध्यक्षपद देण्याची स्थिती निर्माण झाल्यास ती व्यक्ती कोण याबाबत अटकळबाजी सुरू झाली आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्षपद न स्वीकारण्यावर गांधी कुटुंबीय ठाम राहिल्यास आणि अन्य कुणा ‘बिगर-गांधी’ व्यक्तीकडे पक्षाध्यक्षपद देण्याची स्थिती निर्माण झाल्यास ती व्यक्ती कोण याबाबत अटकळबाजी सुरू झाली आहे. यामध्ये लोकसभेतील माजी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जाते. राहुल गांधी यांच्या गटाची ‘चलती’ झाल्यास पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचाही नंबर लागू शकतो."

वेणुगोपाल यांच्या तुलनेत खर्गे यांचे नाव वजनदार आहे. गेल्या लोकसभेत त्यांनी पाच वर्षे (२०१४-२०१९) कॉँग्रेसचे संसदेत नेतृत्व केले होते. ते दलित समाजाचे आहेत हा कॉँग्रेसच्या उत्तरेतील राजकारणाच्या दृष्टीने आणखी मोठा महत्त्वाचा घटक आहे. कॉँग्रेसच्या गोटातून समजलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी देखील त्यांच्या नावाचा विचार हंगामी अध्यक्ष म्हणून करण्यात आला होता परंतु अहमद पटेल व मुकुल वासनिक या व अन्य नेत्यांनी त्यात मोडता घातल्याने ते होऊ शकले नाहीत असे समजते. 

वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळेच राहुल गांधी यांनी त्यांना महासमिती, पक्षसंघटना यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. सध्या ते सर्वांत ‘पॉवरफुल’ सरचिटणीस म्हणून ओळखले जातात. ते केरळचे आहेत. राहुल गांधी यांना केरळमधून(वायनाड) निवडणूक लढविण्यासाठी ज्यांनी कामगिरी बजावली त्यात ते अग्रभागी होते. 

संबंधित बातम्या