Bharat Jodo Yatra: राहुल गांधीची भारत जोडो यात्रा स्थगित, कारण...

Bharat Jodo Yatra: राहुल गांधीची रविवारी होणारी पत्रकार परिषददेखील रद्द केली आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी याबाबतची माहीती दिली आहे.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraDainik Gomantak

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. कॉग्रेसचे खासदार संतोखसिंग चौधरी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संतोखसिंग हे 77 वर्षाचे होते.

शनिवारी राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत चालत असताना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर संतोखसिंग यांना तातडीने दवाखाण्यात हलवण्यात नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोखसिंग यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधीनी भारत जोडो यात्रा स्थगित केली आहे.

त्याचबरोबर, राहुल गांधीची रविवारी होणारी पत्रकार परिषददेखील रद्द केली आहे. पंजाब( Punjab ) काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी याबाबतची माहीती दिली आहे. संतोखसिंग यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार केले जातील. तोपर्यंत यात्रा स्थगित राहिल. अंत्यसंस्कारानंतर यात्रा पुन्हा सुरू व्हावी असे आम्हा सर्वांना वाटते. मात्र मी अद्याप राहुल गांधी यांच्याशी बोललो नाही असेही अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

Bharat Jodo Yatra
Central Government: अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू

जालंधर काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अनपेक्षित आणि धक्कादायक निधनामुळे राहुल गांधी यांची उद्या जालंधरमध्ये होणारी पत्रकार परिषद आता 17 जानेवारीला होशियारपूर येथे होणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी जयराम रमेश यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. दरम्यान, राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com