अयोध्येतील राम मंदिराचा खर्च तब्बल 1,100 कोटी रुपये
construction cost of the Ram Mandir in Ayodhya will exceed Rs 1100 crore

अयोध्येतील राम मंदिराचा खर्च तब्बल 1,100 कोटी रुपये

मुंबई :  अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराचे बांधकाम येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल. मंदिरासाठी 1,100 कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

ते याबाबत म्हणाले, की मुख्य मंदिराचे बांधकाम तीन ते साडेतीन महिन्यांत पूर्ण होईल. या बांधकामासाठी 300 ते 400 कोटी रुपये लागतील. त्याचप्रमाणे, मंदिराच्या संपूर्ण ७० एकर जमिनीवरील इतर बांधकाम, विकासकामांसाठी 1,100 कोटी रुपयांचा खर्च येईल. राम मंदिर निर्माण प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी ही आकडेवारी सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले. 

राम मंदिर निधी ही 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने राबविलेली मोहिम असल्याचा आरोप होत आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, की लोकांना डोळ्यावर लावलेल्या चष्म्याच्या रंगाप्रमाणे जग दिसते. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com