राम मंदिरातील गर्भगृहाचे बांधकाम 1 जून पासून होणार सुरू

योगी आदित्यनाथ करणार बांधकामाचे उद्घाटन
Ram Mandir
Ram Mandir Dainik Gomantak

राम मंदिराच्या उभारणीच्या काळात 1 जून 2022 ही तारीख इतिहासात नोंदवली जाणार आहे. या दिवशी रामललाच्या गर्भगृहाच्या बांधकामाची सुरुवात होईल. देशातील आणि जगातील राम भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी (1 जून) मृगाशिरा नक्षत्र आणि आनंद योगाच्या शुभ मुहूर्तावर विधीवत पूजा करून रामललाच्या गर्भगृहाच्या बांधकामाला सुरुवात होईल. (Construction of sanctum sanctorum at Ram temple will start from June 1)

Ram Mandir
'कोणाच्या तरी भावना दुखावल्या आहेत...': डीयू प्रोफेसरला जामीन मंजूर करताना म्हणाले कोर्ट

पूजेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहाचा पहिला दगड ठेवतील. राम मंदिराच्या विश्वस्तांसह संत आणि धर्माचार्यही या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.

5 ऑगस्ट 2020 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले होते, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रामललाच्या गर्भगृहाच्या बांधकामाचे उद्घाटन करण्याचा बहुमान मिळणार आहे. 11 वैदिक आचार्यांकडून विधीवत पूजा झाल्यानंतर बांधकामाची प्रक्रिया सुरू होईल. सकाळी नऊ वाजता सुरू होणारी पूजा प्रक्रिया दोन तास चालणार आहे.

Ram Mandir
'...भाजप नेत्याची अन्नासाठी भटकंती'

मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण होण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार असला, तरी 1 जूनपासून गर्भगृहाचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. राम मंदिराचे विश्वस्त डॉ.अनिल मिश्रा म्हणाले की, डिसेंबर 2023 पर्यंत रामललाचे गर्भगृह तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे, त्यानुसार काम वेगाने सुरू आहे. प्लिंथ, रिटेनिंग भिंत आणि गर्भगृहाचे बांधकाम एकाच वेळी सुरू राहणार आहे. पुढील महिन्यापासून गर्भगृहाचे बांधकाम सुरू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com