Gujarat Election 2022: 'या' वादग्रस्त माजी पोलीस अधिकाऱ्याचा पक्ष देणार भाजपला टक्कर !

Gujarat Assembly Election 2022: वादग्रस्त माजी पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पक्षाच्या स्थापनेसोबतच भाजप आणि काँग्रेस या दोघांवरही निशाणा साधला आहे.
DG Vanzara
DG VanzaraDainik Gomantak

DG Vanzara Party in Gujarat Polls 2022: गुजरातमध्ये एकेकाळी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे माजी पोलीस अधिकारी डीजी वंजारा यांनी आपला राजकीय 'प्रजा विजय पक्ष' सुरु करताना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या वादग्रस्त माजी पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पक्षाच्या स्थापनेसोबतच भाजप आणि काँग्रेस या दोघांवरही निशाणा साधला आहे.

'प्रजा विजय पक्ष' सर्व 182 जागांवर लढणार

माजी पोलीस अधिकारी वंजारा यांनी त्यांच्या पक्षाच्या शुभारंभाच्या वेळी सांगितले की, '1960 मध्ये गुजरात अस्तित्वात आल्यानंतर अनेक वर्षे काँग्रेस (Congress) सत्तेत होते, आता 27 वर्षे फक्त एकच पक्ष राज्य करत आहे. एकच पक्ष दीर्घकाळ सत्तेत राहिला तर सत्ता भ्रष्ट होते. यापूर्वी काँग्रेसच्या काळात ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता ही परिस्थिती भाजपला (BJP) लागू होत आहे. त्यामुळे काळाची मागणी समजून 'प्रजा विजय पक्ष' गुजरात राज्यातील सर्व 182 जागा लढवणार आहे.'

DG Vanzara
Gujarat Election 2022: यंदाच्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून टाका! पंतप्रधान मोदींचे आवाहन

'हिंदुत्वाची जागा हिंदुत्व घेऊ शकते'

आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वंजारा म्हणाले की, 'जसे परदेशात आहेत, तसे राज्यात दोनच पक्ष आळीपाळीने सत्तेचे सुख उपभोगत आहेत. एक पक्ष 2 वर्षे किंवा 5 वर्षे सत्तेत असावा आणि त्यानंतर सत्ता परिवर्तन कोणत्याही किंमतीत व्हायला हवे. तसे झाले नाही तर अनेक दुष्कृत्ये उद्भवतात जी गुजरातमध्ये (Gujarat) उद्भवली, म्हणूनच आम्ही गुजरातमध्ये प्रजा विजय पक्ष स्थापन केला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com