भाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

कोरोनाच्या लसीकरणावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे खूप दुर्देवी आहे.काही मुसलमान व्यक्तींचा देशावर विश्वास नाही.

 मेरठ: कोरोनाच्या लसीच्या बाबतीत मुस्लिम समुदयाकडून व्यक्त होणाऱ्या संशयाच्या पाश्वभूमीवर मेरठमधील भाजप आमदार संगीत सोम यांनी माध्यमांशी बोलताना,"ज्यांना देशातील वैज्ञानिकांवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावं"

 ते पुढेही म्हणाले,'कोरोनाच्या लसीकरणावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे खूप दुर्देवी आहे.काही मुसलमान व्यक्तींचा देशावर विश्वास नाही.ते देशाच्या पंतप्रधानावर, पोलिसांवर,वैज्ञानिक यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.त्यांना पाकिस्तान जवळचा वाटत असल्यास त्यांनी पाकिस्तानात निघून जावं.देशात लसीकरणाची मोहीम सुरु होणार असताना आमदार  संगीत सोम यांनी असं वादग्रस्त विधान केलं आहे.

कोरोनाची लसीची मात्रा  पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी,  तसेच कोरोना योद्धे यांना दिली जाणार आहे.दरम्यान जगातील मुस्लिमांनी कोरोनाच्या लसीला विरोध करत ही लस डुकराची चरबीयुक्त आसल्याचे सांगत त्यावर प्रश्न उपस्थीत केले आहेत.त्यावर लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यानी सांगितलं, आम्ही कोरोनाची लस बनवत असताना कोणत्याही प्रतिबंधीत गोष्टींचा वापर करत नाही.मात्र वैज्ञानिकांचं म्हणनं आहे की, लसीला स्थिर ठेवण्यासाठी डूकराची चरबी वापरणं गरजेचं आहे.त्यामुळे मुस्लिम समुदयाकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे

संबंधित बातम्या