'बंगालच्या भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य’

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार सौमित्र खान यांनी प्रसिध्द बंगाली अभिनेत्री सयानी घोष हिच्या बाबतीत एक धक्कादायक विधान केले आहे.

 कोलकाता : आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार सौमित्र खान यांनी प्रसिध्द बंगाली अभिनेत्री सयानी घोष हिच्या बाबतीत एक धक्कादायक विधान केले आहे. ‘अभिनेत्री सयानी घोष एक सेक्स वर्कर आहे’ असे म्हणत तिच्यावर टिका केली. सयानी घोष हिने काही दिवसांपूर्वी ट्वीटरवरुन एक मीम्स शेअर केले होते. यामध्ये तिने हिंदू देवतांचा अपमान केला होता. या ट्वीटच्या बाबतीत तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले होते. यातच भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी तिच्या संदर्भात असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

चार वर्षांनंतर शशिकला तुरुंगाबाहेर

‘’सयानी हिने सरस्वती देवीची ट्वीटच्या माध्यमातून अवहेलना केली आहे. यातून हिंदूच्या  भावना दुखावल्या आहेत. पण मी खात्रीने सांगतो, सयानीच खरी सेक्स वर्कर आहे. यानंतर माझ्यावर गुन्हा जरी दाखल केला तरी चालेल. आता खऱ्या अर्थाने ममता बॅनर्जी यांनी उत्तर देण्याची वेळ आली आहे. नाही तर बंगालमध्ये एकसुध्दा मंदिर पाहायला मिळणार नाही.’’ असे भाजप खासदार सौमित्र खान यांनी म्हटले.
सयानी घोष हिने हिंदू देव देवतांच्या भावना दुखावल्या असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंबंधी तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिक्कीमचे राज्यपाल तथागत रॉय यांनी देखील तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सयानी घोष हिने, ‘’माझ्यावर केले जात असणारे आरोप खोटे आहेत असे म्हटले आहे. हे ट्वीट 2015  मधील असून त्यावेळी माझं ट्वीटर आकाऊंट हॅक झालं होतं. त्यामुळे हे ट्वीट मी केलेले नाही.’’ असे सयानीने स्पष्टीकरण दिले आहे.

संबंधित बातम्या