Vikas Divyakirti: भगवान राम अन् सीता यांच्यावरील वक्तव्याने 'Drishti IAS' वादाच्या भोवऱ्यात

Vikas Divyakirti News: UPSC कोचिंग दृष्टी IAS चे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे.
Vikas Divyakirti
Vikas DivyakirtiDainik Gomantak

Vikas Divyakirti News: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकप्रिय UPSC कोचिंग दृष्टी IAS चे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. या कथित व्हिडिओमध्ये ते भगवान राम आणि सीता यांच्याबद्दल बोलत आहेत.

दरम्यान, या व्हिडिओची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. या व्हिडिओवर टीका करणाऱ्यांचा आरोप आहे की, विकास दिव्यकीर्ती यांनी भगवान राम आणि सीता यांचा अपमान केला आहे. त्याचबरोबर अनेक लोक दिव्यकीर्ती यांचे समर्थन करत आहेत. समर्थन करणारे म्हणत आहेत की, केवळ काही सेकंदांचा व्हिडिओ मुद्दाम शेअर केला जात आहे. त्यांनी जे सांगितले आहे, ते शास्त्रात लिहिलेले आहे.

Vikas Divyakirti
Congress News: 'सोनिया गांधींशी सहमत नाही', राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवर काँग्रेस संतप्त

तसेच, राष्ट्र सेविका समितीच्या सदस्या साध्वी प्राची यांनी ट्विटरवर BanDrishtiIAS या हॅशटॅगसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्राची यांनी शेअर केलेला व्हिडिओ केवळ 45 सेकंदांचा आहे. यामध्ये दिव्यकीर्ती रामायणातील एका प्रसंगावर बोलताना दिसत आहेत. दिव्यकीर्ती यांच्या या कथित वक्तव्यावर सोशल मीडियाच्या (Social Media) मोठ्या वर्गातून जोरदार टीका होत आहे. काहींनी हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कोचिंग इन्स्टिट्यूटवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून ट्विटरवर #BanDrishtiIAS ट्रेंड करत आहे.

तथापि, काही विद्यार्थ्यांनी (Students) दिव्यकीर्ती यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन #ISupportDrishtiIAS हा ट्रेंड सुरु केला आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, "जर तुम्हाला #BanDrishtiIAS हवे असेल तर विकास दिव्यकीर्ती यांचे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करा."

Vikas Divyakirti
Gujarat-Himachal Election: गुजरात, हिमाचलमध्ये 'इतके' कोटी रूपये जप्त

दुसरीकडे, या मुद्द्यावर दिव्यकीर्ती यांना पाठिंबा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी असाही दावा केला की, व्हिडिओमध्ये ते जे काही बोलतो आहेत ते खरे आहे. विशेष म्हणजे, प्राचीन धर्मग्रंथातील हे वक्तव्य आहे.

शेवटी, विकास दिव्यकीर्ती त्यांच्या अध्यापनाच्या पद्धतीबद्दल खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com