लोहरीच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी जाळल्या कृषी कायद्याच्या प्रती 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन वादग्रस्त कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आज लोहरीच्या निमित्ताने तिन्ही कायद्याच्या प्रती जाळल्या.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन वादग्रस्त कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आज लोहरीच्या निमित्ताने तिन्ही कायद्याच्या प्रती जाळल्या. मागील चाळीस दिवसांपासून पंजाब, हरियाणा व अन्य राज्यातील शेतकरी सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सिंघू सीमेवर आंदोलन करत आहेत. 

सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी धोरणाच्या विरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी नवीन वर्षातील लोहरीचा सण आंदोलनाच्या ठिकाणीच साजरी करत आहेत. आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या तीन वादग्रस्त कायद्यांच्या प्रती जाळत आपला तीव्र विरोध कायम असल्याचे सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना दिल्लीला हलवणार नाही ; 'एम्स'च्या...

दरम्यान, कालच माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा धक्का देत कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. व तसेच सर्वोच्च न्यायालयाने तोडग्यासाठी म्हणून चार सदस्यीय तज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय दिला होता. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलनाचा विषय व्यवस्थित हाताळला नसल्याची टिप्पणी देखील केली होती. तर शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून नेमण्यात आलेल्या समितीतील सदस्य कायदे समर्थक असल्याचा आरोप केला होता.       

संबंधित बातम्या