आईच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासातच कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल; डॉक्टर मुलांनी जिंकलं मन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 एप्रिल 2021

आईच्या जाण्याने मानसिक धक्का बसलेला असतानाही शिल्पा आणि राहुल कोरोना रुग्णांच्या सेवेत पुन्हा नव्या जोशाने हजर झाले होते.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे सरकार आणि नागरिकांची चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या आईची आठवड्याभरापासून मृत्यूसोबत सुरु असलेली एकाकी झुंज अखेर गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास संपली. रुग्णालयामध्ये आयसीयूतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सहा तासानंतर डॉक्टर शिल्पा पटेल कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी कामावर हजर झाल्या होत्या. वडोदरामधील सरकारी एसएसजी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या शिल्पा पटेल आपल्या कर्तव्यासाठी उपस्थित होत्या. तर दुसऱ्या ठिकाणी 67 वर्षीय आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर राहुल परमार रुग्णालयात हजर झाला होता. (Corona admitted to patient care within hours of the mothers funeral The doctor won the childrens minds)

आईच्या जाण्याने मानसिक धक्का बसलेला असतानाही शिल्पा आणि राहुल कोरोना रुग्णांच्या सेवेत पुन्हा नव्या जोशाने हजर झाले होते. डॉक्टर शिल्पा पटेल यांनी आपल्या 77 वर्षीय आई कांता आंबालाल पटेल यांच्या अंत्यसंस्कारानंतर पीपीई सूट घालून पुन्हा कोरोना रुग्णांवरील उपचार सुरु केले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

डॉक्टर राहुल परमार यांची आई कांता परमार यांचं वृध्दपकाळानं गांधीनगरमधील रुग्णालयात निधन झालं. राहुल परमार सध्या कोविड मॅनजेमेंटसाठी नोडल अधिकारी म्हणून काम करत असून मोठ्या रुग्णालयामधील मृतदेह विल्हेवाट लावणाऱ्या टीमचे ते महत्त्वाचा भाग आहेत. आईच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

''तो एक नैसर्गिक मृत्यू होता. मी कुटुंबासोबत आईचे अंत्यसंस्कार उरकले आणि पुन्हा वडोदराला आलो,'' असं राहुल परमार यांनी सांगितलं. कोरोना संकटातील पहिल्या फळीतील योध्दे असणारे डॉक्टर पहिल्या दिवसापासून आपल्या जिवाची बाजी लावून काम करत आहेत. अशावेळी डॉक्टर शिल्पा आणि राहुल यांनी दाखवलेली बांधिलकी खरचं वाखणण्याजोगी असल्याचं डक्टर विनोद राव यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या