भारतात कोरोनाचा विस्फोट ;24 तासात 1.52 लाख रुग्ण, 839 जणांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

भारतात कोरोनाच्या आकडेवारीचे नवीन रेकॉर्ड बनविणे चालू आहे. रविवारी संपूर्ण भारतात 1.52 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. एका  दिवसात कोरोना रुग्णांमध्ये एवढी वाढ होणं हि चिंतेची बाब आहे.

भारतात कोरोनाच्या आकडेवारीचे नवीन रेकॉर्ड बनविणे चालू आहे. रविवारी संपूर्ण भारतात 1.52 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. एका  दिवसात कोरोना रुग्णांमध्ये एवढी वाढ होणं हि चिंतेची बाब आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी आकडेवारी जाहीर केली, गेल्या 24 तासांमध्ये भारतात  कोरेनाचे  1,52,879  एवढे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत देशात 1,33,58,805 एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  गेल्या 24 तासात देशात 839 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण 1,69,275 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सलग पाचव्य दिवशी देशात कोरोनाचे 1 लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. 10 एप्रिल रोजी 1,45,384 रुग्ण, 9 एप्रिल रोजी 1,31,968, 8 एप्रिल रोजी 1,26,789 रुग्ण  आणि सात एप्रिल रोजी 1,15,736 एवढे रुग्ण आढळले होते.  देशात कोरोनाच्या रुग्णांना बरोबरच मृत्यू देखील वाढत आहेत. देशात सध्या 11,08,087 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.(Corona explosion in India in 24 hours 52 lakh patients, 839 deaths)

भारत-चीनमध्ये सैन्य माघारीवर एकमत; सैन्य स्तरावरील बैठकीच्या अकराव्या फेरीत...

गेल्या 24 तासांत देशातील मुख्य पाच राज्यांत कोरोना रुग्ण वाढले आहेत . महाराष्ट्रात (55,411) रुग्ण आढळले, त्यानंतर छत्तीसगड (14,098), उत्तर प्रदेश (12,748), दिल्ली (7,897) आणि कर्नाटक (6,955) यांचा  क्रमांक लागतो. गेल्या 24 तासांचा झालेल्या मृत्यूंपैकी महाराष्ट्र सर्वात वरती आहे. महाराष्ट्रात 309, छत्तीसगडमध्ये 123, पंजाबमध्ये 58, गुजरातमध्ये 49 आणि उत्तर प्रदेशात 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 

तसेच दुसरीकडे चालू असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये  गेल्या 24 तासात 35,19,987 लोकांनी कोरोनाची लास टोचून घेतली आहे, आतापर्यंत देशात एकूण 10,15,95,147 लोकांना कोरोनाची लास दिली आहे. दरम्यान, वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्र राज्य लोकडाउनच्या तयारीत आहे.  महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात लोकांना बेड मिळत नाहीये. त्याचबरोबर ऑक्सिजनही कमी पडतोय. त्यामुळे येत्या काळात प्रशासन कशाप्रकारे निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

संबंधित बातम्या