कोरोनाचा संसर्ग पाण्यातून होत नाही

Corona is not spread through water
Corona is not spread through water

नवी दिल्ली: सध्याच्या परिस्थीतीचा विचार करता देश एका कठीण अडचणीचा सामना करत आहे, म्हणून लोकांना प्रत्येक वेळी, प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोनाव्हायरस(COVID-19) टाळण्यासाठी, सरकार आणि तज्ञांकडून वेळोवेळी महत्त्वपूर्ण गोष्टी सतत शेअर केल्या जातात, सागितल्या जातात. दरम्यान, नुकत्याच गंगा(Ganga) यमूना(Yamune) नद्यांमध्ये(River) घडलेल्या घटनांबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, 'कोरोनाचा संसर्ग पाण्यातून(Water) होत नाही.' वस्तुतः गेल्या काही दिवसांत गंगा व यमुनामध्ये मोठ्या संख्येने लोकांचे मृतदेह(Death body) वाहात आल्याचे दिसून आले आहे, यामुळे ही मृतदेह कोरोना रूग्णांचीही असू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब समोर येताच लोकांमध्ये चिंतेचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Corona is not spread through water)

उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेमध्ये तर बिहारमधील बक्सरमध्ये मृतदेह सापडले आहेत. यूपी ते बिहार प्रशासन या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात गुंतले आहे. बुधवारी या नद्यांमधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तज्ज्ञांनी म्हटले आहे की पाण्यातून कोरोनाचा संसर्ग होत नाही, म्हणून चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर आयआयटी कानपूरचे प्रोफेसर सतीश तारे म्हणाले की, 'गंगा किंवा तिथल्या उपनद्यांमध्ये मृतदेह टाकून देणे ही फार गंभीर बाब आहे, विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा देश कोरोनासारख्या प्राणघातक आजाराचा सामना करत आहे.'

गंगा आणि यमुना नद्यांच्या काठावर बरीच खेडी आणि शहर वसली आहेत. स्थानिक संस्थांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत या नद्या आहेत. नद्यांच्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात मृतदेह टाकणे. साथीच्या वेळी प्रत्येकाने खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नद्यांमधून संशयित कोरोना रूग्णांचे मृतदेह बाहेर काढले गेले असले तरी नद्यांमध्ये वाहणाऱ्या मृतदेहामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाही, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे तारे यांनी सांगितले.

या घटना उघडकीस आल्या

मंगळवारी बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीतून 71 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ही मृतदेह कोरोना रूग्णांचीही असू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशातील बलियाच्या रहिवाशांच्या मते, नरही भागातील उजियार, कुल्हाडिया आणि भरौली घाटांवर किमान 45 मृतदेह तरंगताना दिसले. मात्र तेथे मृतदेहांची नेमकी संख्या जिल्हा अधिका्यांनी स्पष्ट केली नाही. सोमवारी, हमीरपूर जिल्ह्यातील रहिवाश्यांनी यमुनेत पाच मृतदेह तरंगताना पाहिले आणि लोकांच्या मनात अशी भीती पसरली की ही मृतदेह कोरोना रूग्णांचीही असू शकतात. नंतर मृतदेह नद्यांमधून बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्राने दिले आहे,. या घटनांसंदर्भात मंगळवारी केंद्र सरकारने गंगा किनारी असलेल्या राज्यांना गंगा व तेथील उपनद्यांमध्ये मृतदेह टाकणाऱ्या लोकांना तसेच भविष्यात होणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी कठोर कारवाई करण्यास सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com