महाराष्ट्रासहित 'या' राज्यांमध्येही कोरोनाचा उद्रेक; पाहा तुमच्या राज्यात काय आहे परिस्थिती  

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाकहा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यसरकारांनी पुन्हा लॉकडाऊन ही शक्यता वर्तवली आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाकहा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यसरकारांनी पुन्हा लॉकडाऊन ही शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर कडक निर्बंधही लादले आहेत. बहुतेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर अनेक राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र याशिवाय इतर काही राज्यांमध्येही परिस्थिती गंभीर आहे.  (Corona outbreak in 'these' states including Maharashtra; See what the situation is in your state) 

राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका वाचा काय म्हणाले

देशात एकाच दिवसात कोरोनाची 1.50 लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  तर प्रथमच उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 11 लाखांच्या वर  गेली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडूमध्ये कोरोना बंधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने परिस्थितीत राज्य सरकारांनी कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात शनिवार व रविवार कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तर दिल्ली सरकारने सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन पुढे ढकलण्यात आले आहे.

भारतात कोरोनाचा विस्फोट ;24 तासात 1.52 लाख रुग्ण, 839 जणांचा मृत्यू

दिल्लीत धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी 
कोरोना साथीच्या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी, दिल्ली सरकारने लग्न समारंभात आणि अंत्यसंस्कारांसाठी मर्यादित लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. तसेच,  गर्दी होणारे सर्व सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांवरदेखील बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  याशिवाय मेट्रो आणि बसमध्ये केवळ 50 टक्के प्रवाश्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच बार, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहात 50 टक्के परवानगी दिली आहे. 

महाराष्ट्रात लॉकडाऊनवर विचार
महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे राज्य सरकार पुन्हा निर्बंध अधिक कडक करण्याच्या विचारात आहेत.तर, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, राज्य सरकारने शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत शनिवार व रविवार कडक लॉकडाउन लागू केला आहे.

भारत-चीनमध्ये सैन्य माघारीवर एकमत; सैन्य स्तरावरील बैठकीच्या अकराव्या फेरीत...

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये वाढ 
मध्यप्रदेशतील परिस्थितीही अशीच आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मध्यप्रदेश राज्य सरकारने इंदूर, विदिशा, राजगड, बळवणी आणि शाजापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी वाढविला आहे. आता या जिल्ह्यांतील शहरी आणि ग्रामीण भागात 12 एप्रिलऐवजी 19 एप्रिल पर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन असेल. बालाघाट, नरसिंगपूर, सिवनी आणि जबलपूर जिल्ह्यात 12 एप्रिलपासून (22 एप्रिलपर्यंत) सलग 10 दिवस कडक लॉकडाऊनचे नियम लागू राहणार आहेत. 

गुजरात सरकार लॉकडाऊनच्या विरोधात
गुजरात सरकार राज्यात लॉकडाउन लावण्याच्या बाजूने नाही. मात्र  शहरी आणि ग्रामीण भागातील बाजार संघटनांनी त्यांच्या वतीने लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्वागत केले आहे. सरकार गरिबांच्या समस्या पाहता लॉकडाउन लादू इच्छित नाही. मात्र नागरिकांची अनावश्यक गर्दी वाढू नये यासाठी 24 तासांपैकी 10 तासांसाठी आधीच कर्फ्यू लावण्यात आला आहे.

30 एप्रिलपर्यंत पंजाबमध्ये शैक्षणिक संस्था बंद आहेत
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंजाब सरकारने राजकीय मोर्चांवर बंदी घातली आहे. राज्यभरात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. लग्नाच्या वेळी आणि अंत्यसंस्काराच्या वेळी इनडोअर 50 आणि आऊटडोअर  100 पेक्षा जास्त लोकांवर बंदी  घालण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालये वगळता सर्व शाळा व शैक्षणिक संस्था 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. 

संबंधित बातम्या