केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत कोरोना संशोधन प्रमुखांचा राजीनामा 

दैनिक गोमंतक
सोमवार, 17 मे 2021

जमील हे सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-2 जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी ISCOG) प्रमुख पदावरुन राजीनामा दिला आहे. 

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने स्थापन केलेल्या भारतातील (India) कोरोना विषाणूंच्या (Covid 19) जीनोम सिक्वेन्सिंगबाबत सरकाला सल्ला देणाऱ्या गटप्रमुख शाहीद जमील (Shid jameel) यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जमील हे सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-2 जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी ISCOG) प्रमुख पदावरुन राजीनामा दिला आहे. (Corona research chief resigns over central governments policy)

जमील हे केंद्र सरकारच्या धोरणावरुन मागील काही दिवसांपासून आपली नाराजी उघडपणे व्यक्त करताना दिसत होते. त्यांची आणि सरकारची मते वेगवेगळी असल्याने शाहीद जमील यांनी मध्यरात्री आपल्या गटप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या अशा तडकाफडकी राजीनाम्याने केंद्र सरकारला मोठा झटका मानला जात आहे. 

COVID-19 लसीकरणासाठी आता आधार कार्डची गरज नाही: UIDAI चे स्पष्टीकरण 

देशात कोरोनाचे अनेक प्रकार आढळून आल्याने जानेवारीत आयएसएसीओजीची स्थापना करण्यात आली, यात विषाणूत होणारा बदल केंद्र सरकारला देण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. यात देशभरातून विषाणूंचे सॅम्पल गोळा करुन त्याचा दहा प्रयोगशाळांमध्ये आभ्यास करण्यात येत होता. या गटाच्या स्थापनेनंतर भारतातील या संशोधक गटाने याच्या आभ्यासात बरीच प्रगती केली होती.

याबाबत बोलताना जमील म्हणाले, "डेटाबेसच्या आधारे निर्णय घेणे हा आणखी एक अपघात आहे कारण भारतातील साथीचे रोग नियंत्रणात गेले आहेत. आपण ज्या मानवी किंमतीला तोंड देत आहोत ते कायमस्वरूपी सोडेल. ऑक्सिजनचा (Oxygen) पुरवठा व्यवस्थापित करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याच्या सुप्रीम कोर्टाने (Suprim Court) नुकत्याच घेतलेल्या निर्णयावरही जमीलने टीका केली

संबंधित बातम्या