Corona Update: देशात कोरोना रूग्णसंख्येत वाढ; केंद्र सरकारची वाढली चिंता

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आण्यासाठी लवकरच  महत्तवाचे पावलं उचलण्याचे तसच ‘तपासणी करा, रुग्णशोध घ्या आणि उपचार करा’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले.

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आण्यासाठी लवकरच  महत्तवाचे पावलं उचलण्याचे तसच ‘तपासणी करा, रुग्णशोध घ्या आणि उपचार करा’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले. यामध्ये करोनास्थिती व लसीकरणाबाबत मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यादरम्यान वाढत्या रुग्णसंख्येने देशातील जनतेची चिंता वाढवली आहे. 

गेल्या 24 तासांत देशात 35 हजार 871 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरपासून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या बरोबरच करोना रुग्णसंख्या 1 कोटी 14 लाखांवर पोहोचली असुन ही माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बुधवारी तब्बल 23 हजार 171 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

गोव्यात टाळेबंदी लागू करता येणार नाही 

सप्टेंबरनंतर राज्यात प्रथमच इतकी मोठी दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली. महाराष्ट्रात बुधवारी 24 तासांत 23179 नव्या रुग्णांची नोंद झाली. 84 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह राज्यातील सर्वच भागांमध्ये रुग्ण वाढले,असून दिवसभरात मुंबई 2377, नाशिक शहर 1490, पुणे शहर 2612,औरंगाबाद 979, नागपूर 2698, सातारा 303, अकोला 303, बुलढाणा 532, वर्धा 360 नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या 1 लाख 52 हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 32359 रुग्ण उपचार घेत आहेत.

महाराष्ट्र व देशाच्या काही भागात अचानक झालेली मोठी वाढ विचारात पाडणारी आहे. याविषयी तज्ज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली. त्यावर जगातल्या सर्वच देशांत वैज्ञानिक बारकाईने लक्ष ठेवून असून या बदलाचा अभ्यास करत आहे, असे उत्तर मोदीनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Maharashtra Corona Update: नागपुरात कोरोना स्फोट भाजी आणि धान्याची दुकानेही बंद 

त्याचप्रनमाणे करोनाची लाट रोखण्यासाठी अतिशय महत्तवाचे पावले उचलण्याची तुरताच देताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 45 वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली.

संबंधित बातम्या