Corona Vaccination : लसीकरणाबाबतचा केंद्र सरकारचा नवा 'मास्टर प्लॅन'

दैनिक गोमंतक
सोमवार, 31 मे 2021

या योजने अंतर्गत 30 ते 32 कोटी डोस लसीची उपलब्धता व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानुसार, कोव्हीशल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 25 दशलक्ष डोस दरमहा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त 5 ते 7 कोटी दुसर्‍या लसीचा देखील पुरवठा होईल.

नवी दिल्ली : संसर्गाच्या दुसर्‍या आणि तिसऱ्या लाटेच्या भीतीने केंद्र सरकारने (Central Government) आता कंबर कसली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उच्च सूत्रांनी सांगितले आहे की, सरकार दररोज 1 कोटी (Crore) लोकांना लसी (Vaccination) देण्याची योजना आखत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यापासून हे शक्य व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. Now 1 crore people will be vaccinated every day the central government plans 

या योजने अंतर्गत 30 ते 32 कोटी डोस लसीची उपलब्धता व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानुसार, कोव्हीशल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 25 दशलक्ष डोस दरमहा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त 5 ते 7 कोटी दुसर्‍या लसीचा देखील पुरवठा होईल. यामध्ये बायोलॉजिकल ई, सीरम नोवाव्हॅक्स, जेनोव्हा एमआरएनए, झिडस कॅडिला डीएनए लस, स्पुतनिक व्ही यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात 75 हजार लसीकरण केंद्रे होती. जिथे ही मोहीम राबविली जाऊ शकते. प्रत्येक लसीकरण केंद्रात दररोज 100 ते 150 लोकांना लसी देण्याची योजना आहे.

सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यात 10 कोटी कोविशील्डचे डोस मिळतील; केंद्राला...

आगामी काळात कॉव्हीशल्ड लस एकच डोसमध्ये असावी अशी चर्चा आहे. लसाचा एकच डोस व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहे का याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुतनिक लाईट आणि कोविशिलड या लसी एकाच प्रक्रियेपासून बनविण्यात आल्या आहेत. मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मिक्सिंग ऑफ व्हॅक्सीन्स (एका लसीचा एक डोस आणि दुसर्‍या लसीचा दुसरा डोस) घेतल्यास याचे काय परीणाम समोर येतात या विषयावर अभ्यास सुरु असून, त्याबाबतची माहिती एका लवकरच समोर येईल. हा अभ्यास दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होईल. 

एईएफआय देखील एक ते दोन आठवड्यांत कोव्हिन प्लॅटफॉर्मवर वेगळ्या अ‍ॅपला जोडण्याचा विचार करीत आहे. जेणेकरून त्याचा सहज अहवाल येऊ शकेल. या अ‍ॅपमध्ये एईएफआयसह लसींची संख्या समाविष्ट करण्याची सुविधा असेल.  

संबंधित बातम्या