भोपाळमधील सरकारी रुग्णालयामध्ये माहिती न देता दिली कोरोना लस

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

भोपाळमधील एका सरकारी रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्यांदरम्यान गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.

भोपाळ : भोपाळमधील एका सरकारी रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्यांदरम्यान गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. येथील पीपल्स रुग्णालयात सहाशेपेक्षा अधिक रुग्णांना माहिती न देता त्याच्यावर कोरोना लशीची चाचणी घेण्यात आल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. 

या लशीच्या चाचणीसाठी झोपडपट्ट्यांमधून लोकांना आणण्यात आले होते. त्यांच्यावर चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला प्रत्येकी साडेसातशे रुपये देण्यात आले होते. काही लोक आजारी पडल्यानंतर त्यांच्याकडील कागदपत्रे देखील काढून घेतली असा आरोप काही रुग्णांनी केला आहे.

आणखी वाचा:

‘ब्रिटिश’ कोरोनाचे देशात २० नवे रुग्ण -

संबंधित बातम्या