Corona Vaccine: संशोधनशिवाय मुलांना लस देणं घातक- Delhi High Court

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) शुक्रवारी म्हटले की कोरोना लस (Corona Vaccine) संशोधनाशिवाय मुलांना दिली गेली तर ती मोठी आपत्ती असल्याचे सिद्ध होऊ शकते.
Corona Vaccine: संशोधनशिवाय मुलांना लस देणं घातक- Delhi High Court
Delhi High Court Dainik Gomantak

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) शुक्रवारी म्हटले की कोरोना लस (Corona Vaccine) संशोधनाशिवाय मुलांना दिली गेली तर ती मोठी आपत्ती असल्याचे सिद्ध होऊ शकते. सरन्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने शुक्रवारी वेळोवेळी मुलांसाठी कोरोना लसीबाबत संशोधन करण्याच्या याचिकेवर आक्षेप घेत म्हटले आहे की जर योग्य संशोधनाशिवाय लसीकरण केले गेले तर ही मोठी समस्या बनू शकते. (Corona vaccine is given to children without research then it can prove to be a big disaster)

याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील कैलास वासुदेव यांनी युक्तिवाद केला की जेव्हा मुलांसाठी लसीची चाचणी संपेल तेव्हा एक विशिष्ट कालावधी असेल. शुक्रवारी केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले की, फार्मास्युटिकल मेजर झेडस कॅडिलाची (Zydus Cadila) कोरोना लस लवकरच 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध होऊ शकेल.

Delhi High Court
SSC CGL Recruitment 2020-21: मंत्रालय विभागात 7035 पदांची भरती

केंद्राने सांगितले की झेडस कॅडिलाने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीची चाचणी पूर्ण केली आहे आणि ही लस वैधानिक परवानगीच्या अधीन आहे. अहमदाबाद स्थित फार्मास्युटिकल कंपनीने 1 जुलै रोजी झेकोओव्ही-डी (Zydus Cadila Corona Vaccine) साठी तातडीच्या वापराची मंजूरी मागितली होती. झाइडस कॅडिला ही तीन डोसची आणि जगातील पहिली प्लाझ्माइड डीएनए कोरोना लस आहे.

केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की कोरोना लसीकरण ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि लसीच्या डोसची उपलब्धता लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत 100% लसीकरणासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर खंडपीठाने असे सांगितले की लसची चाचणी पूर्ण झाल्यानंतरच मुलांना लस दिली जावी, चाचणीविना मुलांवर लसीचा वापर केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.

केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोविड लशींच्या क्लिनिकल चाचणीचा निष्कर्ष काढला गेला आहे.केंद्राने म्हटले आहे की कोविड -19 च्या मुलांना लस देण्याचे धोरण तज्ञांकडून परवानगी घेतल्यानंतर तयार केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com