Corona Vaccine : मोनोक्लोनोल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल जूनपासून गुजरातमध्ये उपलब्ध

दैनिक गोमंतक
सोमवार, 31 मे 2021

अमेरिका आणि युरोपमध्ये मोनोक्लोनोल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेलचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही लस घेतल्यानंतर रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही.  

अहमदाबाद : अमेरिकेचे (America) माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, त्यांनी घेतलेले मोनोक्लोनोल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल (Monoclonal Antibody Cocktail) ही लस जूनच्या (June) पहिल्या आठवड्यात गुजरातमधील मेडिकल (Medical) स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे. या  लसीचा डोस घेतल्याने ट्रप यांच्या तब्बेतीत लगेच फरक दिसून आला होता. 

अमेरिका आणि युरोपमध्ये मोनोक्लोनोल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेलचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही लस घेतल्यानंतर रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही.  ही लस दिल्यानंतर ताबडतोब त्या रुग्णाच्या शरीरात अ‍ॅन्टीबॉडी तायार होतात. त्या आपल्या शरीरातील कोरोना विषाणूशी लढा देतात. 

कोरोना चाचणीपासून बचाव करण्यासाठी आदीवासींचे पलायन!

लसीकरणानंतर, रुग्णाच्या शरीरातील कोरोना विषाणू शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करत नाहीत. ज्यामुळे कोरोना विषाणूची वाढ आपोआप थांबते. या लसीची किंमत 59,300 रुपये इतकी आहे. मधुमेह, हृदय, मूत्रपिंड आणि रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी देखील ही लस प्रभावी आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि ही लस शरीरात जाताच त्याचे कार्य सुरु होते.

फार्मा कंपनी सिप्ला आणि रेशो ही लस भारतात सुरू करीत आहे. ही लसची 80 टक्के पर्यंत प्रभावी असल्याचे म्हटले जात आहे. कासिरविमेब आणि इन्डीविमेब नावाच्या रसायनांपासून तयार केलेली आहे.

संबंधित बातम्या