लडाख मधील ITBP च्या 20 जवानांना देण्यात आली कोरोनाची लस 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता या विषाणूला रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात सुरू झाली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता या विषाणूला रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात सुरू झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लसीकरणाच्या मोहिमेचे उदघाटन केले. कोरोनाची लस सगळ्यात अगोदर एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या दोन कोटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. यानंतर, 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना ही लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची ही मोहीम सुरु झाल्यानंतर लडाखमध्ये तैनात असलेल्या इंडो-तिबेटियन सीमा पोलीस दलातील 20 आरोग्य कर्मचा्यांना कोरोनाची लस देण्यात आली.   

देशात कोरोना विरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात पोहचली असून, आजपासून लसीकरणाची मोहीम चालू झाली. यामध्ये इंडो-तिबेटियन सीमा पोलीस दलातील लडाख मध्ये तैनात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे. इंडो-तिबेटियन सीमा पोलीस दलाचे प्रवक्ते विवेक कुमार पांडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सीमारेषेवर असलेल्या आरोग्य विभागातील दोन महिला अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी कात्यायनी शर्मा पांडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. स्कलजंग आंग्मो यांचा समावेश असल्याची माहिती प्रवक्ते विवेक कुमार पांडे यांनी दिली. 

दरम्यान, देशातील आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाच्या लढाईत आघाडीवर असलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या लसीचा खर्च सरकार उचलणार आहे. याशिवाय आजपासून सुरु झालेली लसीकरणाची पहिली मोहीम देशभरातील 3006 लस केंद्रांवर सुरु होईल. ज्यात एका केंद्रावर एका सत्रात 100 जणांना लस देण्यात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच डीसीजीआयने सीरम इन्स्टिटयूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन मंजुरी दिली होती.          

संबंधित बातम्या