पाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू!; ICMR-WHO कडून नाल्यातील पाण्याची चाचणी

Corona virus found in water Test of Nala water from ICMR WHO
Corona virus found in water Test of Nala water from ICMR WHO

देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ऑक्सिजन सिलेंडर (Oxygen Cylinder) , वैद्यकीय उपकरणं, रेमडिसिव्हीर इंजेक्शन(Remdesivir Injection), रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध न होणं अशी एक एक संकटं समोर असताना आता नवं संकट उभं राहिलं आहे. पाण्यामध्ये कोरोनाचे विषाणू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेशची(Uttar Pradesh) राजधानी असलेल्या लखनौमधील (Lucknow) नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असता. तेव्हा तपासणीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Corona virus found in water Test of Nala water from ICMR WHO)

नदीपात्रात वाहत असलेल्या मृतदेहांवरुन पाण्यात कोरोनाचे विषाणू पसरल्याची चर्चा जोर धरत होती. त्यामुळे आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओने पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यास सुरुवात केली होती. पाण्याचे नमुने तपासण्यासाठी 8 सेंटर तयार करण्यात आले आहेत. लखनौमधील रुकपूर, घंटाघर, आणि मछली  मोहाल भागामधील नाल्यामधून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. 19 मे रोजी या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा रुकपूर खरदा येथील नाल्यातील पाण्यात कोरोनाचे विषाणू असल्याचं आढळून आलं आहे. एसजीपीआय लॅबनं याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना दिली आहे.

'काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोना रुग्णाचा अभ्यास केला होता. तेव्हा आम्हाला भिती होती की, रुग्णाच्या विष्ठेतून विषाणू पाण्यात पोहोचू शकतो. जे लोक कोरोना पॉझिटिव्ह असताना होम आयसोलेट होतात त्यांच्या विष्ठेतून विषाणू नाल्यापर्यंत पोहोचू शकतो. नाल्यामधून पाणी थेट नदीपात्रात पोहोचतं. या पाण्यातून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होणार की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्याचा नागरिकांच्या जीवाला किती धोका आहे हे अभ्यासाअंती कळू शकणार आहे, असं डॉक्टर उज्ज्वला घोषाल यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com