कोरोनाचा कहर: मृतदेहांचा अत्यंसस्कार करायला मिळेना जागा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

दुर्ग जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यामुळे स्मशानभूमीबाहेर मृतांचा ढीग लागला आहे.

दुर्ग: देशभरात कोरोना उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यातच काही ठिकाणची परीस्थीती अत्यंत बिकट होत चालली आहे. कोरोनाचा विषाणू वेगाने फैलावत असल्याकारणाने काही ठिकाणी मृतांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील परीस्थीती अत्यंत चिंताजनक बनत चालली आहे. दुर्ग जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यामुळे स्मशानभूमीबाहेर मृतांचा ढीग लागला आहे. अवघ्या सात दिवसामध्ये 38 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

छत्तीसगढमधील दुर्ग जिल्हा कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावीत झाला असून, मागील काही दिवसांपासून मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या अचानक वाढल्यामुळे स्मशानभूमी आणि दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नाहीये. मागील दोन दिवसात मृतांची संख्या वाढली आहे. अनेक मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले आहेत. त्यामुळे दोन ते तीन ठिकाणी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्याची सोय करण्यात येत आहे, असे दुर्गच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

भाजप उमेदवाराच्या वाहनात सापडले ईव्हीएम; चार अधिकारी निलंबित

वाढत्या कोरोनाच्या पादुर्भावामुळे दुर्ग प्रशासनाने जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तर दुसरीकडे 500 बेडची व्यवस्था असलेल्या शासकीय़ रुग्णालयामधील डॉक्टर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यास असमर्थ ठरत आहेत. 

 

संबंधित बातम्या