कोरोनाचा विक्रमी उच्चांक; एक दिवसांत 1.68 लाख नव्या रुग्णांची नोंद 

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोना विषाणूची दुसरी लाट रोज नवे  रेकॉर्ड करत आहेत. देशात सोमवारी 1 कोटी 35 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट रोज नवे  रेकॉर्ड करत आहेत. देशात सोमवारी 1 कोटी 35 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार,  गेल्या 24 तासांत 1 लाख 68 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  तर गेल्या 24 तासात विक्रमी 904 लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, या काळात 75 हजाराहून अधिक लोक बरे झाले होऊन घरी परत गेले आहेत.  (Corona's record high; 1.68 lakh new patients registered in one day) 

Board Exam 2021: मजुरांनंतर सोनू सूदने उठवला विद्यार्थ्यांसाठी आवाज

आज देशातील कोरोनाची आकडेवारी 
एकूण कोरोना प्रकरण - एक कोटी 35 लाख 27 हजार 717 
एकूण डिस्चार्ज - एक कोटी 21 लाख 56 हजार 529 
एकूण सक्रिय प्रकरणे - बारा लाख एक हजार नऊ
एकूण मृत्यू - 1 लाख 70 हजार 179

लसीकरणात आघाडीवर असलेली 5  राज्ये
महाराष्ट्र - 1.01 कोटी
राजस्थान - 97.16 लाख
गुजरात - 92.60 लाख
यूपी- 88.25 लाख
पश्चिम बंगाल -  88.25 लाख

Kumbh Mela 2021: शाही स्नानासाठी झालेल्या गर्दीत कोरोना नियमांचे वाजले तीनतेरा

दरम्यान,  रविवारी 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 53 हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  शनिवारी कोरोनामुळे 839 लोकांचा मृत्यू झाला. तथापि, कोरोनाहून 90,584 लोक बरे झाले होते. याआधी शुक्रवारी 145,384 नवीन प्रकरणे उघडकीस आली.

संबंधित बातम्या