कोरोनाचा कहर, तरीही IFFIत 96 देश 624 प्रवेशिका!

आज पणजी शहरात 52 व्या इफ्फीच्या प्रारंभ.
कोरोनाचा कहर, तरीही IFFIत 96 देश 624 प्रवेशिका!
52 IffiDainik Gomantak

जगभरात कोरोना असूनही 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यात होणाऱ्या 52 व्या इफ्फीमध्ये (Iffi) भाग घेण्यासाठी 96 देशांमधून विक्रमी 624 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या ही अतिशय अभिमानाची बाब आहे. ही संख्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे असलेले महत्त्व सूचित करते. पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 1952 मध्ये मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता आणि आज पणजी शहरात इफ्फीच्या 52 (52 Iffi) व्या संस्करणाला प्रारंभ होतो आहे. भारतीय चित्रपट महोत्सव अनेक पटीने वाढला आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश आहे हे आपण जाणतो. भारतात तयार होणारे चित्रपट जगभर पसंत केले जातात. त्यामुळे, परदेशी चित्रपट निर्माते भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी भारतात येण्याची आणि इफ्फीच्या भारतीय पॅनोरामा विभागात असलेले भारतीय चित्रपट पाहण्यासाठी आणि इतर देशांतील इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची इच्छा बाळगतात.

52 Iffi
निवडणुकांमुळेच कृषी कायदे मागे पी. चिदंबरम यांचं मत तर केजरीवालांचंही सरकारवर टीकास्त्र

निवडक चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले जाते आणि त्यांना फेस्टिव्हल हॉटेल (फाइव्ह स्टार) मध्ये ३ रात्रीचे आदरातिथ्य दिले जाते. गोवा इफ्फीचे (Goa Iffi) यजमानपद सांभाळत असल्याने हा सारा खर्च गोवा सरकारच उचलते. या दिग्दर्शकांचा चित्रपट सुरू होण्यापूर्वी त्याना व्यासपीठावर बोलावून त्यांचे स्वागत केले जाते. ते आपल्या चित्रपटाची ओळख थोडक्यात करतात.

अधिक महत्त्वाचे असते ते चित्रपट संपल्यानंतर प्रश्नोत्तराचे असणारे सत्र. यात प्रेक्षकांकडून दिग्दर्शकाला चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. हे सत्र खूप उद्बोधक असते. दिग्दर्शक थिएटरबाहेर पडताच काही पत्रकार, चित्रपट समीक्षक त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी बाहेर थांबलेले असतातच. नवीन, तरुण, होतकरू दिग्दर्शकांचा या दिग्दर्शकांना गराडा पडतो. जगप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर उत्सुक तरुणांची चर्चा चालली आहे अशा प्रकारचे बहारीचे दृश्‍य अशा चित्रपट महोत्सवातूनच पहायला मिळते.

इफ्फीमधील मोठ्या सहभागाचे आणखीन एक कारण म्हणजे सुवर्ण आणि रुपेरी मयुर पुरस्कारांचे आकर्षण. पुरस्काराची रोख रक्कम साधारण रु. 90 लाख असते. खूप कमी देश आहेत जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसे दिली जातात. याशिवाय, गोवा हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहेच, जिथे परदेशी चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकाना गोव्याचे समुद्रकिनारे आणि इतर पर्यटन स्थळांचा आनंद घेणे आवडते. परदेशी प्रतिनिधींना भारतीय खाद्यपदार्थ आणि भारतीय आदरातिथ्य आवडते.

गोवा इफ्फीचे कायमस्वरूपी ठिकाण बनवल्यापासून इफ्फीमध्ये सहभागी होणाऱ्या विदेशी प्रतिनिधींची संख्या वाढली आहे. 2004 मध्ये गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर याना त्या काळच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यानी एक प्रश्न विचारला, ‘गोव्याला मी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव भेट म्हणून देते आहे. ही भेट आपल्याला आवडेल काय? अर्थात पर्रीकरानी ‘हो’ म्हणयला फार उशीर केला नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com